घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

सराईत आरोपीकडून गावठी कट्टा व जिवंत काडतूस जप्त

पुणे, दि. २३ मार्च २०२६ — भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने कात्रज परिसरात मोठी कारवाई करत संभाव्य घातपाताचा कट उधळून लावला आहे. पोलिसांनी एका सराईत आरोपीला अटक करून त्याच्याकडून गावठी बनावटीचा कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व त्यांचे पथक हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे व अभिनय चौधरी यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कात्रज येथील गंधर्व लॉन्ससमोरील रतन मोटर्सजवळ कात्रज घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक संशयित इसम अग्नीशस्त्रासह फिरत आहे.

सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संशयिताचा शोध घेतला. यावेळी लक्ष्मण दगडू कचरे (वय २२, रा. कात्रज, पुणे) हा इसम पोलिसांच्या ताब्यात आला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे सुमारे ५० हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत काडतूस आढळून आले.

पोलिसांनी तात्काळ शस्त्र जप्त करून आरोपीविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नं. ११०/२०२६ अन्वये भारतीय हत्यार अधिनियम कलम ३ सह २५ व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करत आहेत.

सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त (पश्चिम प्रादेशिक विभाग) राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ २) मिलिंद मोहीते तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त (भारती विद्यापीठ विभाग) राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

ही यशस्वी कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या सूचनांनुसार पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व त्यांच्या पथकातील सागर बोरगे, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार व संदीप आगळे यांनी संयुक्तपणे पार पाडली.

या कारवाईमुळे कात्रज परिसरातील संभाव्य गंभीर गुन्हा टळल्याचे मानले जात असून पोलिसांच्या सतर्कतेचे कौतुक केले जात आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें