घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

म्हाळुंगे-बालेवाडीत कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

म्हाळुंगे-बालेवाडी येथील एका नियोजित गृहप्रकल्पात सुतारकाम करणाऱ्या कारागिराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षासाधने उपलब्ध करून न दिल्याने बाणेर पोलिसांनी ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

उज्ज्वल मजुमदार (वय ३२, रा. म्हाळुंगे-बालेवाडी) असे मृत्यूमुखी पडलेल्या कारागिराचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नी सरस्वती मजुमदार (वय २८) यांनी बाणेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ठेकेदार कंपनीतील कर्मचारी प्रवीण चंद्रकांत जवळकर, रा. औंध) आणि महेंद्र केशव चांडगे (रा. सहकारनगर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मजुमदार हे लोटस रिअलिटी गृहप्रकल्पात सुतारकाम करत होते. १८ मार्च रोजी दुपारी सुमारास ते काम करताना अचानक पाऊस सुरू झाला. त्यावेळी प्लायवूड कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कटरची वायर घेत असताना त्यांना विजेचा जोरदार धक्का बसल्याने ते बेशुद्ध पडले.

घटनेनंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षाविषयक साधने उपलब्ध करून न दिल्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा आरोप पत्नीने फिर्यादीत केला आहे. यानुसार पोलिसांनी संबंधित ठेकेदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें