घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक;मुख्य आरोपी वर्षभरानंतर अटकेत

एडलवाईज ब्रोकिंग लिमिटेड या कंपनीत गुंतवणूक करून तसेच शेअर मार्केटिंगच्या नावाखाली कोट्यावधी रुपयाचा गंडा घालणाऱ्या आरोपी सिद्धेश मनोज काळे (राहणार कोलदरे ता. आंबेगाव) याला तब्बल एक वर्षांनी अटक करण्यात आली.

या गुन्ह्यातील त्याचे दोन साथीदार गणेश दत्तात्रय गव्हाणे (राहणार साल ता आंबेगाव) व राहुल दिलीप काळे (राहणार शिंदेवाडी ता आंबेगाव ) यांना कोर्टातून यापूर्वीच जामीन मिळाला आहे.सिद्धेश काळे यास घोडेगाव न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक सागर पवार यांनी दिली.

यात फिर्यादी शिवाजी गाडे व इतर २१ जणांची दोन कोटी ९४ लाख ६३ हजार ८०१ रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यात अनेक लोकांची फसवणूक झाली असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.घोडेगाव पोलीस ठाणे येथे सागर पवार यांनी पत्रकारांना या संदर्भात माहिती दिली.

सिध्देश मनोज काळे (रा. कोलदरे, ता. आंबेगाव), गणेश दत्तात्रय गव्हाणे (रा. साल, बाभुळवाडी, ता. आंबेगाव) व राहुल दिलीप काळे (रा. शिंदेवाडी, ता. आंबेगाव) या तिन व्यक्तिंनी संगणमत करून शेअर मार्केटींग व एडलवाईज ब्रोकिंग लिमिटेड या कंपनीच्या नावाखाली वार्षिक चांगला परतावा देतो असे सांगत 2 कोटी 94 लाख 63 हजार 801 रूपयांचा परतावा न देता गुंतवणूक केलेले पैसे न देता आर्थिक फसवणूक केली गेल्याचे गुंतवणूकदारांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी घोडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रार दाखल झाल्यानंतर यातील गणेश गव्हाणे व राहुल काळे यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयाने जामिन मंजूर केला. तिसरा गुन्हेगार सिध्देश काळे सुमारे वर्षभरापासून त्याचे अस्तित्व लपवून राहत होता. दरम्यानच्या काळात त्याने दोन वेळा अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी दोन वेळा प्रयत्न केला.

परंतु त्यास जामीन मिळाला नाही. अखेर घोडेगाव पोलीसांनी त्याचा शोध घेत त्यास अटक केली . त्यास न्यायालयाने न्यायालयीन कोठडी दिली. असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर पवार यांनी सांगितले.

शेअर मार्केटींग व एडलवाईज ब्रोकिंग लिमिटेड या कंपनीत ज्या नागरिकांनी गुंतवणूक केली आहे. मात्र त्यांना गुंतवणूक केलेले पैसे परत मिळाले नसतील त्यांनी या तिघांच्या विरोधात घोडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक सागर पवार यांनी केले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें