घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

देशभक्तीच्या सुरांत आंबेगांव खुर्दमध्ये ७७वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

ज्येष्ठ नागरीक संघातर्फे आंबेगांव खुर्द मध्येप्रजासत्ताक दिनी देशभक्तीपर गितेसादरआंबेगांव खुर्द,पुणे_येथील ज्येष्ठ नागरिक संघ जांभुळवाडी रोड,आंबेगांव खुर्द ह्या नोंदणीकृत संघातर्फे भारताचा ७७वा प्रजासत्ताक आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यांत आला.

संघाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत गुरव,उपाध्यक्ष संजय रणसिंग,सहसचिव वैजनाथ शेटे,सहखजिनदार अनिल ढोकले,कार्यकारिणी सदस्य पुरुषोत्तम देवगांवकर,सभासद सुर्यकुमार भोकरे,चंद्रकांत थोरात इत्यादिनी स्वातंत्र्य चळवळीतील विविध घटनांची व थोर नेत्यांच्या कार्याची आठवण करून दिली आणि ह्या कार्यानुसार चालण्याची गरज आहे अशी आशा व्यक्त केली.

याप्रसंगी भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणार्‍या हुतात्म्याना दोन मिनिटे स्तब्धता पाळुन भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यांत आली.प्रजासत्ताक दिना निमित्त ज्येष्ठ नागरिक संघ जांभुळवाडी रोडचे सभासद आणि गायक अनिल ढोकले,सुर्यकुमार भोकरे आणि पुरुषोत्तम देवगांवकर यानी देशभक्तीपर स्फुर्तीगिते सादर केली.

याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघ जाभुळवाडी रोडचे आजीव सभासद अशोक बडवे यानी ७७वर्षे पुर्ण केल्याचे औचित्य साधुन त्यांचा आणि श्रावणबाळ ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष,नामदेव सरडे,सभासद नामदेव धुमाळ,सखाराम जाधव यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यांत आला.तसेच संघाचे सभासद आणि गायक सर्वश्री अनिल ढोकले,सुर्यकुमार भोकरे,पुरुषोत्तम देवगांवकर यांचा सुद्धा गुलाब पुष्प देऊन  देशभक्तीपर गिते गायल्या बद्दल सत्कार करण्यांत आला.अल्पोपहार आणि चहापानाने या सुखद,आनंददायी,स्फुर्तिदायी कार्यक्रमाचा समारोप झाला.चंद्रकांत गुरव,मुक्त पत्रकार.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें