महानगरपालिकेचे एकूण 53 बाह्यरुग्ण विभाग, 20 प्रसूतिगृहे, चारशे खाटांचे एक सर्वसाधारण रुग्णालय आणि एक सांसर्गिक आजारांचे रुग्णालय कार्यरत आहे.बाह्यरुग्ण विभागात दररोज सरासरी 12 हजार रुग्ण आणि 300 आंतररुग्ण उपचार सेवा घेतात. दरवर्षी 30 लाख रुग्ण आरोग्यसेवेचा लाभ घेतात. दरवर्षी 8500 प्रसूती होतात. या सर्व सुविधा विनामूल्य पुरविण्यात येतात.
शहरी गरीब औषधे वैद्यकीय साह्य योजना, अंशदायी वैद्यकीय साह्य योजनांचा लाभ घेणाऱ्या नागरिकांची संख्या एक लाखाहून अधिक आहे. त्यासाठी सुमारे 150 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात येत आहे. महानगरपालिकेच्या वैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये कमला नेहरू रुग्णालय आणि अण्णासाहेब मगर रुग्णालयातील आरोग्यसेवांचे विस्तारीकरण व अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे.सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावरील महानगरपालिकेचे देशातील पहिले कॅन्सर हॉस्पिटल बाणेर येथे सुरू होणार आहे.
सर्व प्रकारच्या कर्करोगावर उपचाराचा भाग म्हणून लिनियर एक्सलेरेटरद्वारे रेडिओथेरपी ही उपचारपद्धती माफक दरात मिळणार आहे.शहरात उभारणार अकरा मल्टिस्पेशालिटी रुग्णालये : महानगरपालिकेची शहरातील सहा प्रसूतिगृहे आणि पाच रुग्णालये मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांमध्ये विकसित करण्यात येतील. या रुग्णालयांमध्ये विविध अत्याधुनिक उपचार सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येतील.
प्रसूतिगृहांमध्ये आयव्हीएफ उपचार सेवामहानगरपालिकेच्या प्रसूतिगृहांमध्ये ’आयव्हीएफ’ ही वंध्यत्वावरील आधुनिक उपचार सेवा दिली जाईल. त्यामुळे गरीब कुटुंबीयांना ’सीजीएचएस’ दरात प्रगत वैद्यकीय उपचारांची सुविधा. मातृत्वाच्या स्वप्नपूर्तीसाठी योजना ठरणार महत्त्वपूर्ण.
गंगाधाम परिसरात एमआरआय व सिटी स्कॅन सेवा केंद्र :
नागरिकांना विविध आजारांच्या निदान सुविधा अत्यल्प दरात उपलब्ध करून देण्यासाठी गंगाधाम परिसरात एमआरआय व सीटी स्कॅन सेवा केंद्र उभारण्यात येईल.महिलांना मिळकत करात 50 टक्के सवलतमहिलांच्या मालकी हक्काला प्रोत्साहन देण्यासाठी आणि शहरातील मालमत्ता नोंदणीला चालना देण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत महिलांच्या मालकीच्या 500 चौरस फुटांपर्यंतच्या मिळकतींना 50 टक्के मिळकत करमाफी देण्याची योजना राबविण्यात येईल.
विद्यार्थिनींसाठी पिंक रूममहानगरपालिकेच्या 75 शाळांमध्ये ’ती’ची हक्काची जागा (पिंक रूम) विकसित केली जाणार आहे. शारीरिक-मानसिक बदल अनुभवणाऱ्या किशोरवयीन मुलींच्या मनातील विविध प्रश्नांचे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निराकरण केले जाणार आहे.
शिक्षण: 75 रोल मॉडेल स्कूल75 शाळांमध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या (एनईपी) प्रभावी अंमलबजावणीतून दर्जेदार भौतिक सुविधा, प्रशिक्षित मनुष्यबळ आणि गुणवत्तावाढीच्या योजना राबविण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार या 75 शाळा ’रोल मॉडेल शाळा’ म्हणून विकसित केल्या जाणार आहेत.
पर्यावरणपूरक पुणे वायूप्रदूषण नियंत्रण यंत्रणा
वाढत्या वायूप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारण्यासाठी (एक्यूआय) देशातील पहिली अत्याधुनिक प्रदूषण नियंत्रण यंत्रणा सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर उभारण्यात येईल. या यंत्रणेमुळे हवेच्या गुणवत्तेचे सातत्याने मोजमाप करून प्रदूषणाच्या पातळीवर लक्ष ठेवता येईल. यंत्रणेतून मिळालेल्या माहितीच्या आधारे आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे शक्य होईल.
वृक्ष लागवड: महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून एका वर्षात 50 लाख झाडे लावण्यात येणार आहेत. त्यासाठी आवश्यकतेनुसार केंद्र व राज्य शासनाची मदत घेतली जाईल.
शहरी जलयुक्त शिवार: महानगरपालिका आणि समाविष्ट गावांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात टेकड्या व वन विभागाच्या जमिनी आहेत. पुणे वन विभागाबरोबर संयुक्त प्रकल्प राबवून शहरी जलयुक्त शिवार ही योजना राबविण्यात येईल.
उद्याने: मिरॅकल गार्डन शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे ’मिरॅकल गार्डन’ विकसित करण्यात येणार असून, आकर्षक फुलांची रचना, थीमआधारित उद्यान संकल्पना आणि पर्यटनाला चालना देणारे अनोखे निसर्ग सौंदर्यस्थळ निर्माण करण्यात येईल.












