घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

सुनेत्रा पवारांवरचा दबाव वाढला, राष्ट्रवादीच्या महिला नेत्या राजीनाम्यासाठी नेत्या एकवटल्या

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या नावाची चर्चा झाल्यानंतर त्यांना महिला आयोगाचे अध्यक्षपद सोडावं लागलं होतं.

त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी एक मुखाने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे रूपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

याबाबत सुनेत्रा पवार यांना रुपाली चाकणकरांच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याकरिता मागणी करणारं पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिक जिल्ह्यातील महिला जिल्हाध्यक्ष आणि भगूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष असलेल्या प्रेरणा बलकवडे त्यांच्यासह जिल्ह्यातील सर्व महिला तालुका अध्यक्षांचा समावेश आहे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महिलांचा सन्मान आणि न्यायासाठी कटिबद्ध असलेला पक्ष आहे. याच मूल्यांवर विश्वास ठेवून आम्ही, नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रबादी महिला कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या, पक्षाचे काम निष्ठेने करत आहोत. परंतु, आज पक्षाच्या अस्तित्वावर आणि तत्त्वांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, आणि त्याच तीव्र वेदनेतून आम्ही हे आवाहन करत आहोत.

अशोक खरात यांच्याकडून अनेक महिला आणि तरुण मुलींचा छळ आल्याच्या भयानक प्रकरणात पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांचा थेट संपर्क असल्याचे उघड झाले आहे. ही अत्यंत लज्जास्पद बाब आहे. की, अनेक वर्षांपासून महिलांचा छळ करणाऱ्या व्यक्तीचे त्या समर्थन करत आहेत. यामुळे राज्याच्या राजकारणात पक्षाच्या प्रतिमेचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.

ही त्यांची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी हगवणे प्रकरण व इतर प्रकरणात देखील त्यांचा निष्काळजी कार्यामुळे पक्षाचे नाव खराब झाले आहे. त्यावेळी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचावर कारवाई करायची व निवडणुकीनंतर महिला प्रदेशाध्यक्ष बदलण्याची चर्चा त्यांनी अनेक वेळी केली होती. पक्षाला प्रत्येकवेळी या संवेदनशील प्रकरणांची माहिती असूनही त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई कधी झाली नाही आणि त्याच दुर्लक्षामुळे आज पक्षावर ही गंभीर वेळ ओढवली आहे.

आज पक्षाची प्रतिमा समाजात डागाळली आहे. आपल्या महिला प्रदेशाध्यक्षांचे नाव प्रकरणात जोडल्याने व महिलांचा छळ करणाऱ्यांचे समर्थन करतात, त्या महिला नेतृत्वाखाली आम्ही तळागाळातील महिला कार्यकर्त्या काम करू शकत नाही. आज ग्रामीण भागात आम्ही महिला त्यांचासोबत काम केले तर लोकांमध्ये आमच्याविषयी चुकिची छवी निर्माण होईल. लोकांमध्ये जाऊन पक्षाच्या तत्त्वांविषयी बोलणे आम्हाला अशक्य होणार आहे.

त्यामुळे, आम्ही, नाशिक जिल्ह्यातील सर्व कार्यकारणी सदस्य, तालुका अध्यक्ष आणि कार्यकर्ते, आपणास एकमताने आणि अत्यंत गंभीरपणे हे कळवत आहोत की, जर रुपाली चाकणकर यांना तात्काळ पदावरून हटवले नाही, तर आम्ही सर्व जण आमची कर्तव्ये पार पाडू शकणार नाही.

महाराष्ट्रातील जनतेमध्ये पक्षाची प्रतिमा वाचवण्यासाठी आणि पक्षाच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी, आम्ही आपणास विनंती करत आहोत की, रुपाली चाकणकर यांना पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून आणि इतर सर्व पदांवरून तात्काळ बडतर्फ करण्यात यावे.आपण यावर त्वरित कारवाई करून पक्षाची होणारी अपरिमित हानी टाळान, हीच शेवटची आशा आहे. असे पत्रात म्हटले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें