घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुण्यात बाजीराव रोडवर श्रीराम नवमी निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन

पुणे (प्रतिनिधी): अखिल बाजीराव रोड रामनवमी उत्सव समिती, ट्रस्ट पुणे यांच्या वतीने श्रीराम नवमी निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सालाबादाप्रमाणे यंदाही हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.

गुरुवार, दिनांक २६ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ७.०० ते १०.०० या वेळेत प्रभू श्रीरामांची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर, तसेच आकर्षक देखावे यामुळे शोभायात्रा लक्षवेधी ठरणार आहे.

ही शोभायात्रा हुजूरपागा, बाजीराव रोड, पुणे येथून सुरू होणार असून, मोठ्या संख्येने भाविक व नागरिक उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

उत्सवाच्या माध्यमातून धार्मिक भावना दृढ करण्याबरोबरच सामाजिक एकात्मता वाढविण्याचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.कार्यक्रमास नागरिकांनी मित्रपरिवारासह आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक अमर भालेराव (तात्या) यांनी केले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें