घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

जांभळी येथे वृद्धाचा खून करून कामगार फरार

नसरापूर (ता. भोर) : नसरापूर–वेल्हा मार्गावरील जांभळी येथे 75 वर्षीय वृद्धाचा निर्घृण खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणातील आरोपी कामगार फरार झाला आहे. किसन बापू सुर्वे (वय 75) असे मृत वृद्धाचे नाव असून ते ‘हॉटेल 7/12’चे मालक यांचे सासरे होते.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, किसन बापू सुर्वे हे जांभळी येथील ‘हॉटेल 7/12’ परिसरात वास्तव्यास होते. मध्यरात्रीच्या सुमारास हॉटेलमध्ये काम करणाऱ्या एका कामगारासोबत त्यांचा काही कारणावरून वाद झाला असावा. या वादाचे रूपांतर हिंसक भांडणात होऊन संबंधित कामगाराने संतापाच्या भरात दगडाने सुर्वे यांच्या डोक्यावर जबर मारहाण केली.

या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.ही घटना रात्री घडली असली तरी आज दुपारी ती उघडकीस आली. सकाळपासून सुर्वे दिसत नसल्याने शोध घेतला असता हॉटेल परिसरात रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह आढळून आला. यानंतर घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली.माहिती मिळताच राजगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.

पोलिसांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले असून आरोपी कामगार फरार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली असून परिसरात शोधमोहीम सुरू आहे.दरम्यान, या खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वैयक्तिक वाद, पैशांचा वाद की अन्य काही कारण आहे, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

घटनेमुळे जांभळी परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें