घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

शिवसेनेत मोठा कलह, आदित्य ठाकरेंनी राऊतांची कॉलर धरली?

महाविकास आघाडीतर्फे राज्यसभेवर शरद पवार यांची निवड झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटामध्ये मोठे नाराजीनाट्य पाहायला मिळत आहे. राज्यसभेवर जाण्यासाठी शरद पवार यांना पाठिंबा देण्यावरुन संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचे सांगण्यात येत आहे.याचबाबत शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी ट्वीट करत आदित्य ठाकरेंनी राऊतांची कॉलर पकडल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

विधानपरिषदेच्या रिक्त जागांवर संधी मिळवण्यासाठी शितल म्हात्रे, निलम गोऱ्हे अकलेचे तारे तोडत आहेत, अशी टीका सुषमा अंधारेंनी केली होती. अंधारेंच्या या टिकेला उत्तर देताना शितल म्हात्रेंनी मोठे विधान केले आहे. “ताई, उबाठाच्या निवृत्तीनंतर रिक्त झालेली विधान परिषदेची जागा मिळवण्यासाठी मातोश्रीच्या मॅडमची किती चापलूसी कराल? प्रियांका चतुर्वेदींची राज्यसभेची जागा घेण्याचा तुमचा डाव फसला,आता थेट उबाठाच्या जागेवरच डोळा आहे की काय तुमचा? त्यातच आदू बाळाने गेल्या आठवड्यात गांजा राऊतची कॉलर धरली म्हणे,” असा खळबळजनक दावा म्हात्रेंनी केला आहे. ताई, खासदार-आमदार व्हायची स्वप्नं आता सोडून द्या, मॅडमच्या इशाऱ्यावर तुम्ही कितीही नाचलात तरीही तुमच्या राजकीय जीवनातला अंधार काही दूर होणार नाही, अशी टीकाही शितल म्हात्रेंनी केली आहे.

काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे?

“एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये विधान परिषदेच्या काही जागा भरायच्या आहेत. राज्यसभेच्या निमित्ताने एका चौथ्या पाचव्या फळीतल्या महिलेने ज्या पद्धतीने नीलम गोरे किंवा शितल मात्रे या बायकांचा Self Goal केला ते बघता आता आपण गाफील राहून चालणार नाही असे या तथाकथित स्वयंघोषित शिंदेंच्या निकटवर्तीयांना वाटते,”

“विधान परिषदेची जागा मिळवायची असेल तर मग आता शिंदेंची भाटगिरी आपल्यालाही करावीच लागेल आणि ती अधिक तीव्रतेने करावी लागेल यासाठी दोघीही जोमाने कामाला लागल्या मग सभागृहामध्ये नीलम गोरे अकलेचे तारे तोडायला लागल्या तर सभागृहाच्या बाहेर शितल म्हात्रे…. म्हात्रे काय गोरे काय… यांचे कवित्व करायला पाने पुरणार नाहीत, दोघींनाही प्रेमळ सल्ला, आवरा स्वतःला मला संशोधन करण्याची वेळ आणू नका..!” असा टोला सुषमा अंधारेंनी लगावला होता.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें