शुक्रवार, दि. १३ मार्च २०२६ रोजी रमजान महिन्यात उपवास सोडत असताना सासवडजवळील आस्करवाडी परिसरातील तलावाजवळ मुस्लिम बांधवांवर सशस्त्र समाजकंटकांकडून हल्ला करण्यात आला होता.
या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले असून तिघांना गंभीर दुखापत झाली होती. सदर प्रकरणात सुरुवातीला पोलिसांनी किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल केल्याने समाजवादी पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
गंभीर गुन्ह्यांऐवजी किरकोळ गुन्हे दाखल केल्याच्या निर्णयाला विरोध करत आरोपींवर कठोर कलमे लावावीत आणि त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी करण्यात आली होती.या संदर्भात समाजवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार अबू असिम आझमी यांनी अधिवेशन काळात विधिमंडळात दोन वेळा प्रश्न उपस्थित केला होता.
तसेच समाजवादी पार्टी पुणे शहरच्या वतीने दि. २३ मार्च २०२६ पासून ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. दरम्यान, आज दि. २७ मार्च २०२६ रोजी सकाळी पोलिसांकडून दूरध्वनीद्वारे आरोपींना अटक केल्याची माहिती देण्यात आली. तसेच लेखी पत्राद्वारे आंदोलन स्थगित करण्याची विनंती करण्यात आली.
त्यानुसार समाजवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.या प्रकरणातील पोलीस तपासावर समाजवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आमदार अबू असिम आझमी तसेच समाजवादी पार्टी पुणे शहर यांचे लक्ष राहणार असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.
या आंदोलनाला हमाल पंचायत, SDPI, रिक्षा पंचायत, NAPN, सत्यशोधक बहुजन आघाडी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (I), PUCL, मराठा आंदोलक, CPI आदी संघटना व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला होता. तसेच अनेक सुजाण नागरिकांनीही आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. त्यांच्या सर्वांचे समाजवादी पक्षातर्फे आभार मानण्यात आले आहेत.
पदाधिकारी :जांबुवंत मनोहर – अध्यक्ष, पुणे शहरअनिस अहमद – महाराष्ट्र राज्य सरचिटणीससाधनाताई शिंदे – महिला जिल्हाध्यक्ष, पुणेदत्ता पाकिरे – सरचिटणीस, पुणे शहर व जिल्हाविनायक लांबे – राज्य कार्यकारिणी सदस्यअशोकराव गायकवाड – राज्य कार्यकारिणी सदस्यअनिरुद्ध सुर्यवंशी – उपाध्यक्ष, पुणे शहरशहाजहान झारी – सचिव, पुणे शहरप्रकाश डोंबाळे – संघटक, पुणे शहरजावेद शेख – शिवाजीनगर मतदारसंघ अध्यक्षइब्राहिमभाई यवतमाळवाले – शहर कार्यकारिणी सदस्यभारत मालुसरे – शहर कार्यकारिणी सदस्यशमीम पठाण – शहर कार्यकारिणी सदस्यअजिम शेख – कार्याध्यक्ष, शिवाजीनगर मतदारसंघ, पुणे












