घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

राम जन्मोत्सव मिरवणुकीदरम्यान, डीजेच्या कर्णकर्कश आवाजाने महिलेचा मृत्यू

पुण्यातील ससाणे नगर परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डीजेच्या तीव्र आवाजाने एका ज्येष्ठ महिलेचा मृत झाल्याची घटना आहे. या घटनेनं उत्सवात ध्वनी प्रदूषण आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला.संबंधित प्रकरणात मृत महिलेचं नाव रंजना रवींद्र जाधव (वय 65) असे आहे. मंगळवारी रात्री सुमारे आठ वाजता ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेनं परिसर हादरून गेला आहे.

घडलेल्या घटनेनुसार, परिसरात श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मिरवणुकीचे आयोजन केले होते. या मिरवणुकीत डीजेचा आवाज सुरु होता. हिच मिरवणूक बघण्यासाठी रंजना जाधव घरातील काम आटोपून रस्त्यावर आल्या होत्या. मात्र, काही वेळानंतर त्यांच्या छातीत वेदना झाल्या, नंतर त्या अचानकपणे जमिनीवर कोसळल्या.

डीजेच्या आवाजाने त्यांनी मदतीसाठी आरोळ्या ठोकल्या पण त्याकडे कोणाचंही लक्ष गेलं नाही. सोबतीला असलेल्या महिलांना संबंधित प्रकरणाची बाब लक्षात आली असता, त्यांनी मदतीसाठी हालचाल केली. जाधव यांना तातडीने रुग्णालयात रिक्षातून पाठवण्यात आले होते. दरम्यान, मिरवणुकीत मोठी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली, यामुळे रुग्णालयात जाणं कठीण होऊन बसलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची तपासणी केली आणि अशातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला.

मृत महिलेचा मुलगा सौरभ जाधव यांनी डीजेच्या अति आवाजामुळे आईला मोठा त्रास होऊन तिचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला. त्यांनी सांगितलं की, घटनास्थळी पोलीस असूनही त्यांनी ध्वनीच्या आवाजावर कोणतेही नियंत्रण ठेवले नाही. तसेच वाहतूक कोंडीमुळे वेळेतच उपचार मिळू न शकल्याने हा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा आरोप आहे. या घटनेनं शहरात असणाऱ्या ध्वनीप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याची अधिक गरज असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें