घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

विश्वब्राम्हण समाजाचा कालिका महोत्सव उत्साहात

पुणे दि. २९. “अवघ्या जगात सद्य परिस्थितीत निर्माण झालेल्या तणावपूर्ण अस्थिर वातावरणात , हे कालिकामाते विश्वशांतीसाठी तुझ्या कृपाशीर्वादाने स्थैर्य निर्माण होऊन सर्वत्र सुख नांदो तसेच निरपराध्यांचे कल्याण होवो या करिता आशीर्वाद दे. शांतीमय वातावरण निर्माण कर. जागतिक युद्धाचे संभाव्य ढग नष्ट कर. जगाच्या कल्याणासाठी प्रयत्न कर. ” अशी प्रार्थना ह. भ. प. माधव वेदपाठक (नमो गुरुजी) यांनी पुणे परिसरातील विश्वब्राम्हण समाजाने आयोजित केलेल्या कालिका मातेच्या महोत्सवात केली.

पुणे शहर व जिल्हा विश्वब्राम्हण समाजातर्फे श्री कालिकादेवी महोत्सव प्रचंड उत्साहात तसेच अतिशय भक्तिमय अशा वातावरणात पार पडला. ज्येष्ठ साहित्यिक बबन पोतदार, अनिल पारखे, गजानन सोनार-पंडित आणि सामाजिक कार्यकर्ते सुभाष दीक्षित, यांच्या प्रेरणेने हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

कालिकादेवीची विधिवत पूजा आणि मंत्राभिषेक पुरोहित विवेक दीक्षित यांनी यथासांग धार्मिक पद्धतीने पार पाडला. श्री किशोर पंडित व मनीषा पंडित या दांपत्याने पुजेची जबाबदारी स्वीकारली होती. या धार्मिक कार्यक्रमासाठी अनेक समाज बांधव भगिनींची विशेष हजेरी होती.

विश्वब्राम्हण समाजातील प्रताप वेदपाठक, गोपाळ वेदपाठक, भास्कर दीक्षित, पद्माकर धर्माधिकारी, प्रदीप पोतदार, मुकुंद महामुनी, मोहन पोतदार, डॉ. सुरेंद्र पंडित आदि मान्यवरांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. या प्रसंगी प्रा.वैभव वेदपाठक यांचा सन्मान करण्यात आला. मकरंद दीक्षित यांनी सूत्रसंचालन केले. सुधाकर पंडित यांनी आभार प्रदर्शन केले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें