घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

तांब्याचे हांडे चोरणाऱ्या महिलांच्या टोळीला ठोकल्या बेड्या

राज्यासह देशभरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, दररोज चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये आणि व्यवसायिकांमध्ये भिती पसरत आहे.अशातच आता एक मोठी चोरीची घटना समोर आली आहे.

जुन्नर येथील व्यावसायिकाच्या भांड्याच्या गोडाऊनमधून नव्वद तांब्याचे हांडे चोरणाऱ्या महिलांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.

त्यांनी चोरलेल्या ९० हांड्यापैकी सुमारे एक लाख ३७ हजार ५०० रुपये किमतीचे ५५ हांडे त्यांच्या ताब्यातून जप्त करण्यात आले आहेत. चोरीची ही घटना २० मार्च रोजी रात्रीच्या वेळी घडली होती.याबाबत जुन्नर पोलीस स्टेशनला व्यावसायिक आनंद हेमंत सासवडे यांनी फिर्याद दिली होती.

महाजन आळी-जुन्नर येथील त्यांच्या भांड्याच्या गोडाऊनमधून तीन महिलांनी ही चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येत होते. ह्या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेमार्फत समांतर तपास करत असताना परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता भांड्याच्या गोडाऊनमधून काही अज्ञात महिला हांडे चोरून नेत असताना दिसून आले.

यावरून सदरचा गुन्हा अज्ञात महिलांनी केल्याचे निष्पन्न झाले.दिपक साबळे व पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार याचा गुन्हा सारिका बबन मकवाने, अंजली सुरज वाघमारे, सुरेखा राजू वालेकर (सर्व रा. पंचलिंग झोपडपट्टी वस्ती जुन्नर) यांनी केल्याचे निष्पन्न झाले.

गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार कुरण फाटा, जुन्नर येथे सापळा लावून सदर महिलांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा कबूल केला. संदीप गिल्ल, रमेश चोपडे, धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद क्षीरसागर, किरण अवचर, महादेव शेलार, दिपक साबळे, राजू मोमीन,संदीप वारे,अक्षय नवले, निलेश सुपेकर, नंदा कदम, सुजाता कदम, सागर हिले यांनी ही कारवाई केली आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें