घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

जी. एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटी, पुणे येथे ‘कौशल्यसेतू २०२६’ उत्साहात संपन्न

पुणे: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आज उद्योगांमध्ये आमूलाग्र बदल घडवत असून नाविन्यपूर्ण संधी निर्माण करत आहे. उदयोन्मुख तंत्रज्ञान प्रभावीपणे समजून घेण्यासाठी आणि त्याचा वापर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले पायाभूत ज्ञान आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन टाटा मोटर्सचे जनरल मॅनेजर (CTO) प्रमोद जगताप यांनी केले.

जी. एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटी, पुणे तर्फे आयोजित ‘कौशल्यसेतू २०२६’ या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमामुळे उदयोन्मुख संशोधकांना त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळाली.पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य डॉ. श्याम मुडे यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात कौशल्य-आधारित शिक्षणाचे वाढते महत्त्व विषद केले.

जी. एच. रायसोनी इंटरनॅशनल स्किल टेक युनिव्हर्सिटीचे प्र -कुलगुरू डॉ. वैभव हेंद्रे म्हणाले की, कौशल्यसेतू २०२६ हे विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि सृजनशील विचार विकसित करण्यासाठी एक सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देते.

या परिषदेत राज्यातील विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांतील ६०० हून अधिक विद्यार्थ्यांनी आपले नाविन्यपूर्ण प्रकल्प आणि शोधनिबंध प्रदर्शित व सादर केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. अमोल पोटे, डॉ. प्रवीण जांगडे, डॉ. संदीप रासकर आणि अमिता सिंग यांनी विशेष परिश्रम घेतले.

रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्ष श्री. सुनील रायसोनी, कार्यकारी संचालक श्री. श्रेयस रायसोनी आणि जी. एच. रायसोनी स्किल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर. डी. खराडकर यांनी या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें