घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

उरुळी कांचन येथे गॅस ग्राहकांची उघड लूट सुरु

घरगुती वापरासाठीचा (एलपीजी) गॅस सिलिंडर ग्राहकांना शासनाने निर्धारित केलेल्या किमतीला म्हणजेच 916 रुपयांना घरपोच देणे गॅस एजन्सींना बंधनकारक आहे. असे असतानाही उरुळी कांचन (ता.हवेली) येथील सुरानंद एचपी गॅस एजन्सीच्या काही वाहकाकडून ग्राहकांकडून मात्र 916 रुपयांचा सिलेंडर ‘घरपोच शुल्क (होम डिलिव्हरी चार्ज) आकारणी’च्या नावाखाली ग्राहकांना 950 रुपयांना विकत घ्यावा लागत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

दैनंदिन महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला आता गॅस वितरकांकडून ‘अघोषित’ कात्री लावली जात आहे. गॅस सिलेंडरच्या किमतीबाबत व घरपोच नियमाबाबत अचूक माहिती नसल्याने गॅस वितरण एजन्सींनी ग्राहकांना घरपोच सिलेंडर देण्यासाठी नेमलेले मध्यस्थच नागरिकांकडून ‘घरपोच शुल्क (होम डिलिव्हरी चार्ज) आकारणी’च्या नावाखाली बेकायदा वसूली करत असल्याचे पुढे आले आहे.

त्यामुळे या वाढीव 34 रुपयांच्या वसुलीमुळे नागरिक संतप्त झाले असून, ही कमिशनखोरी आहे की, युद्धाच्या नावाखाली सुरू असलेली लूट, असा सवाल उपस्थित केला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, उरुळी कांचन येथील सुरानंद एचपी गॅस एजन्सीचे डिलिव्हरी बॉईज सिलेंडर घरपोच देताना पावतीवरील किमतीपेक्षा 30 रुपये जास्त मागत आहेत.

ग्राहकाने विचारणा केल्यास “गाडीभाडे वाढले आहे” किंवा “मागूनच रेट वाढून आले आहेत” अशी उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. प्रत्यक्षात गॅसच्या पावतीवर सर्व टॅक्स आणि डिलिव्हरी चार्जेस समाविष्ट असतानाही 950 रुपये घेतल्याने ग्राहकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धाचा परिणाम इंधन दरांवर होत असला, तरी अधिकृत दर वाढल्याशिवाय पावतीपेक्षा जास्त पैसे घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. “जर पावती 916 रुपयांची आहे, तर वरचे 34 रुपये कोणाच्या खिशात जात आहेत?” असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. प्रत्येक सिलेंडरमागे होणारी ही छोटी वाटणारी रक्कम हजारो ग्राहकांचा विचार करता लाखो रुपयांच्या घरात जाते.

ही एक प्रकारची संघटित ‘कमिशनखोरी’ असल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.दरम्यान, पूर्व हवेलीतील उरुळी कांचन व परिसरातील अनेक नागरिकांनी या लुटीबाबत संताप व्यक्त केला आहे. “आधीच महागाईने कंबरडे मोडले असताना, अशा प्रकारे उघडपणे होणारी लूट प्रशासनाने थांबवावी,” अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें