घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

राज्यातील शाळांसाठी ‘या’ तारखेपासून उन्हाळ्याची सुट्टी जाहीर

एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्य मंडळाशी संलग्न असलेल्या राज्यभरातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २ मेपासून उन्हाळी सुटी देण्यात येणार असून, पुढील शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी सर्व शाळा १५ जूनपासून सुरू करण्याचे निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत.

यामुळे विदर्भासह संपूर्ण राज्यातील शाळा यंदा एकाच दिवशी सुरू होणार आहेत.प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी व माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण निरीक्षकांना परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत.

राज्य मंडळाच्या शाळांमधील उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत एकसमानता आणि सुसंगती राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.या सूचनेनुसार राज्यातील सर्व राज्य मंडळाच्या शाळांतील विद्यार्थ्यांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात येणार आहे. मात्र इतर मंडळांच्या शाळांमध्ये नियोजित वेळापत्रकानुसार वर्ग सुरू असतील किंवा काही महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम सुरू असतील, तर अशा शाळांमधील सुट्टीबाबतचा निर्णय संबंधित शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर घेण्याचे सांगण्यात आले आहे.

पुढील शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये विदर्भासह राज्यातील सर्व विभागांतील राज्य मंडळाच्या शाळा १५ जूनपासून सुरू करण्यात येणार आहेत. विदर्भातील उन्हाळ्यातील जास्त तापमानाचा विचार करून तेथील शाळा १५ जून ते २९ जून या कालावधीत सकाळी ७ ते ११. ४५ या वेळेत भरवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

त्यानंतर ३० जूनपासून शाळा नियमित वेळेत सुरू करण्यात येणार असल्याचे परिपत्रकात नमूद आहे.यापूर्वी विदर्भातील तापमान आणि उष्णतेमुळे त्या विभागातील शाळा राज्यातील इतर भागांपेक्षा साधारण आठ ते दहा दिवस उशिरा सुरू केल्या जात होत्या.

मात्र यंदापासून वेळापत्रकात बदल करून राज्यभरातील सर्व राज्य मंडळाच्या शाळा १५ जूनला एकाच दिवशी सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. विदर्भात मात्र उष्णतेचा विचार करून सुरुवातीच्या कालावधीत सकाळच्या सत्रात शाळा भरवण्याची सवलत देण्यात आली आहे. असे गोसावी यांनी सांगितले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें