घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

वीज कोसळून विवाहितेचा मृत्यू

खंडाळा तालुक्यातील कराडवाडी येथे ‘पांदी’ नावाच्या शिवारात शेतात काम करताना अंगावर वीज पडून सोनाली अजित कराडे या विवाहितेचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सोनाली कराडे शेतात काम करत असताना आज सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान अचानक वातावरणात बदल होऊन विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला.

यादरम्यान त्यांच्या अंगावर वीज पडल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.त्यांना उपचारासाठी तत्काळ हलविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

यामुळे कराडवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे कराडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें