घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

अंदमान टूरचे स्वप्न दाखवून भामट्यांनी घातला ६ लाखांचा गंडा

बनावट ट्रॅव्हल एजन्सीच्या नावाखाली अंदमान-निकोबार सहलीचे आमिष दाखवत हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील एका व्यापाऱ्याची तब्बल ६ लाख ६ हजार ४०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी अज्ञात सायबर चोरट्यांच्या विरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राहुल उत्तम काळभोर (वय ४५,रा.वाकवस्ती, लोणी काळभोर) असे फसणवुक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे.राहुल काळभोर हे महिलांच्या साहित्याचे दुकान चालवतात.आपल्या मित्रांसह अंदमान-निकोबार येथील सहलीचे नियोजन करत असताना त्यांनी गुगलवर ट्रॅव्हल एजन्सींचा शोध घेतला.

यावेळी त्यांना “बिग गोल ट्रॅव्हल्स” या नावाची वेबसाईट आणि सोशल मीडियावरील माहिती मिळाली.अमर वर्मा नावाच्या व्यक्तीने मोबाईल व व्हॉट्सअ‍ॅपद्वारे काळभोर यांच्याशी संपर्क साधून फ्लाइट व हॉटेल बुकिंग करण्याचे आश्वासन दिले.विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी संबंधिताने कंपनीचे लायसन्स,जीएसटी क्रमांक तसेच इंस्टाग्राम अकाउंटची माहिती पाठवली.

कागदपत्रे व ऑनलाईन उपस्थिती पाहून फिर्यादी व त्यांच्या मित्रांचा विश्वास बसला.आरोपींनी दिलेल्या सूचनांनुसार २ मार्च ते १८ मार्च २०२६ या कालावधीत काळभोर यांनी युनियन बँक व एचडीएफसी बँकेतील वेगवेगळ्या खात्यांमधून पैसे ट्रान्सफर केले.विमान व हॉटेल बुकिंगच्या नावाखाली एकूण ६ लाख ६ हजार ४०० रुपये आरोपींच्या खात्यांमध्ये जमा करण्यात आले.

सुरुवातीला आरोपींकडून पुणे ते श्री विजयपुरम (अंदमान) या प्रवासासाठी फ्लाइटचा पीएनआर क्रमांक आणि हॉटेल बुकिंगची माहिती पाठवण्यात आली.परंतु परतीच्या प्रवासाची माहिती देण्यास ते टाळाटाळ करू लागले. संशय आल्याने काळभोर यांनी संबंधित फ्लाइटची तपासणी केली असता ती बुकिंग रद्द झाल्याचे समोर आले.तसेच हॉटेलशी संपर्क साधल्यावर बुकिंग झाले असले तरी पेमेंट न झाल्याचे स्पष्ट झाले.

आरोपींनी विविध कारणे देत वेळकाढूपणा सुरू केला आणि अखेर संपर्कच तोडला.काळभोर यांना आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी सायबर पोर्टलवर तक्रार नोंदवली.त्यानुसार लोणी काळभोर पोलिस ठाण्यात मोबाईल नंबर, व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट,वेबसाईट लिंक व संबंधित बँक खात्यांच्या आधारे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें