घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

संभाजीनगरमध्ये प्रसिद्ध कीर्तनकारला घरात घुसून बेदम मारहाण; धक्कादायक कारण समोर

छत्रपती संभाजीनगरमध्ये किर्तनात केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याच्या रागातून एका किर्तनकाराला घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून पोलिसांकडून तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर कीर्तनकार हा छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गांधिली गावात राहणारा आहे. काही दिवसांपूर्वीच चंद्रग्रहण लागले होते. या चंद्रग्रहणादरम्यान सांगलीमधील एका गरोदर महिलेने पालेभाज्या, फळे चिरून खात या सर्व अंधश्रद्धा असल्याचा संदेश दिला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यावरुनच बोलताना निवृत्ती महाराजांनी टीका केली होती.

या टीकेमुळे काही जण संतप्त झाले. त्यानंतर संबंधित व्यक्तींनी जमाव करून कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली. या वेळी घरात त्यांचे कुटुंब उपस्थित होते. मारहाणीच्या गोंधळात त्यांनाही धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे.

या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. या मारहाणीनंतर महाराजांनी व्हिडिओद्वारे जाहीर माफीही मागितली. माझ्याकडून चुकून वादग्रस्त वक्तव्य बोलले गेले, त्याबद्दल मी माफी मागतो, मात्र माझ्या कुटुंबावर, माझ्यावर अशाप्रकारे हल्ला करणे योग्य नाही. कायदेशीर कारवाई करायला हवी होती, असं ते म्हणाले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें