घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

तीन महिन्यांपासून फरार आरोपीला अटक : भारती विद्यापीठ पोलिसांची कौशल्यपूर्ण कारवाई

पुणे : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नोंद असलेल्या शरीराविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यातील तीन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे.

भारती विद्यापीठ पोलीस ठाणे, पुणे शहर येथे गुन्हा रजि. क्र. ५२/२०२६ अन्वये भा. न्या. संहिता कलम ११८(२), ११५(२), ३५२, ३(५) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपी अष्किार राजेश जगताप (रा. ओहाळयाडा, कात्रज, पुणे) हा मागील तीन महिन्यांपासून फरार होता.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक आरोपीचा शोध घेत होते. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व त्यांच्या पथकाला आरोपी कात्रज जंक्शन परिसरातील एका हॉटेलजवळ थांबलेला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ कात्रज-कोंढवा रोडवरील कान्हा हॉटेल परिसरात सापळा रचला. शोध मोहिमेदरम्यान आरोपी अष्किार जगताप याला पकडण्यात यश आले. त्यानंतर त्याला दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२.३५ वाजता अटक करण्यात आली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त मिलिंद मोहिते व सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आयारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.या यशस्वी कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तसेच पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवारे, निलेश खैरमोडे, तुकाराम सुतार, किरण साबळे, मंगेश गायकवाड आणि संदीप आगळे यांनी सहभाग घेतला.पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे फरार आरोपींविरुद्ध कठोर कारवाई सुरू असल्याचा स्पष्ट संदेश गुन्हेगारांमध्ये गेला आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें