पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एका 30 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. गुरुवारी (ता.02) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कोरेगाव मूळ (ता.02) ग्रामपंचायत हद्दीतील इनामदार वस्ती परिसरात घडली.
प्रदीप रमेश ईगळे (वय- 30, सध्या रा शिवाजी नगर मूळ रा. अमरावती) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, सदर तरुण हा शिवाजीनगर परिसरात आपल्या पत्नीसह राहत होता. दोघांमध्ये गावी जाण्यामुळे वाद सुरू असल्याची माहिती मिळाली. पत्नी रागाने एका खाजगी बसने पुण्यावरून सोलापूर च्या बाजूने निघाले होते.
यावेळी प्रदीप याने पत्नी निघालेल्या बस चा दुचाकीवरून पाठलाग सुरू केला.दरम्यान कोरेगाव मूळ येथील इनामदार वस्ती परिसरात आले असता अज्ञात वाहनाने प्रदीप च्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत प्रदीप चा जागीच मृत्यू झाला.
सदर अपघाताची माहिती मिळताच कस्तुरी रुग्णवाहिकेचे संतोष झोंबाडे व माऊली लाड यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. व खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पुढील तपास उरुळी कांचन पोलीस करीत आहेत.












