घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या विद्यार्थ्याला महापालिकेच्या डंपरने चिरडले

शहरात अत्यंत धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे. परीक्षेहून घरी परतणाऱ्या एका तरुण विद्यार्थ्याचा महापालिकेच्या कचरा वाहणाऱ्या डंपरखाली चिरडून मृत्यू झाला आहे.

ओंकार रायभान खनसे असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो परीक्षेनंतर मोपेडवरून घरी परतत होता. प्रॅक्टिकल परीक्षा दिल्यानंतर काही वेळ मित्रांसोबत घालवून ओंकार मिल कॉर्नरमार्गे छावणीच्या दिशेने निघाला होता.

दरम्यान, बारापुल्ला गेट परिसरात कचरा संकलन करणाऱ्या कंपनीच्या डंपरने त्याला समोरून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता, की ओंकारचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच छावणी पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, नागरिकांकडून रस्ते सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें