घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

अपहरणाच्या प्रकरणातून ड्रग्जचे रॅकेट उघड; ‘ते’ 76 जण पोलिसांच्या रडावर

अल्पवयीन मुलीचे अपहरणाचा (प्रेमप्रकरण) तपास सुरू असताना याप्रकरणात पकडलेल्या आरोपींच्या चौकशीत ड्रग्ज रॅकेट उघड झाले आहे. पुर्ण शहरात पसरलेल्या या रॅकेटमधून धक्कादायक माहिती समोर आली असून, ड्रग्ज विक्री करणारे तसेच ते घेणारे अशा ७६ जणांची माहिती पोलिसांकडे आली आहे.

आता हे सर्वजण पोलिसांच्या रडारवर आले आहेत. आरोपी पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.सुनील गोपाळ राठोड उर्फ राठ्या राठोड (वय २८), राजन गोपाल नायर (वय ३७), जतीन जयवंत कदम (वय २६, रा. वारजे) व शुभम संतोष दहिभाते (वय २८, रा. कोंढवे धावडे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी २ लाख ३६ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

याप्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टनुसार स्वतंत्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त निखील पिंगळे, उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राघवेंद्र क्षिरसागर, उपनिरीक्षक अक्षय पाटील, चेतन धनवडे, पोलिस अंमलदार चेतन बराटे, शेलार, पाडळे, अनिरूद्ध गायकवाड, ज्ञानेश्वर तोडकर व त्यांच्या पथकाने केली आहे.

उत्तमनगर पोलिस ठाण्यात एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला होता. मुलगी प्रेमप्रकरणातून गेल्याचे समजले होते. गेल्या काही महिन्यांपासून या गुन्ह्यातील आरोपी राठ्या राठोड हा फरार होता. वरिष्ठ निरीक्षक राघवेंद्र क्षिरसागर यांच्याकडून हद्दीतील सराईतांची ‘परेड’ घेण्यात आली होती. तेव्हा त्यांनी हद्दीत काही बेकायदेशीर असेल तर कळविण्याचे सूचवले होते.

तेव्हा पोलिस निरीक्षक क्षिरसागर यांना माहिती मिळाली त्यानूसार पोलिसांनी तिघांना अटक केली. तर, चौघांचा शोध सुरू आहे.३०० ट्रान्झेक्शन अन् ड्रग्ज रॅकेट उघडराठ्या राठोड याच्या मोबाईलची पोलिसांनी तपासणी केली असता त्यात गेल्या चार महिन्यात जवळपास ३०० हून अधिक ट्रान्झेक्शन झाल्याचे दिसून आले. हा व्यवहार जवळपास ९ लाखांचा होता. त्यात दोन ते अडीच हजारांचे ट्रान्झेक्शन जास्त प्रमाणात होते. तर, काही ट्रान्झेक्शन हे १० ते १५ हजारांचे होते. पोलिसांचा संशय बळावल्यानंतर पोलिसांनी या सर्व गोष्टी बारकाईने तपासल्या असता ड्रग्ज रॅकेट उघडकीस आले.

राठ्या राठोड याच्या मोबाईलचा तांत्रिक तपास केल्यानंतर ३०० ट्रान्झेक्शनमधील चाळणी केली. त्यात ७२ जणांना त्याने हे एमडी विकले असल्याचे दिसून आले. तर चौघांकडून ड्रग्ज विकत घेतल्याचे समोर आले आहे. त्यानूसार, आता पोलिस हे ड्रग्ज घेणाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलवणार असून, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे पेणाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें