घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

खरातनंतर नाशकात आणखी एक मोठं कांड

महिलांना फसवून लैंगिक अत्याचार करणाऱ्या नाशिकमधील भोंदू अशोक खरात याचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक सेक्स कँडल नाशिकमध्ये उघडीस येत आहे. मैत्रिणीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका व्यावसायिकाकडून 12 लाखांची खंडणी मागण्यात आली होती.

याप्रकरणी चार संशयितांना सातपूर पोलिसांना ताब्यात घेतले आहे. तक्रारदार व्यावसायिकाची पण चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. हे चारही जण व्यावसायिकाला ब्लॅकमेल करीत होते. मैत्रिणीसोबतचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याला ब्लॅकमेल करण्यात येत होते.

ब्लॅकमेलींगचा दहा हजार रुपयांचा पहिला हफ्ता घेताना पोलिसांनी चार जणांना सापळा रचून पकडले. आरोपींकडून जप्त केलेल्या टॅबमध्ये तब्बल दीडशे ते दोनशे आक्षेपार्ह खासगी व्हिडीओ पोलिसाना आढळले आहेत. या प्रकरणी सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चार जणांची चौकशी सुरु आहे. आकाश बकरे, प्रकाश पानपाटील, सूरज गवई, श्रीपत शिंदे अशी चौघांची नावे आहेत.

अशोक खरात अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं आहे. त्यांचे १०० हून अधिक अश्लील व्हिडीओ पोलिस तपासात समोर आले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे. हा घडनेने महाराष्ट्र हादरला असतानाच नाशिकमधून आणखी एक मोठं कांड उघडकीस आलं आहे.

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार,

आरोपींनी नाशिकमधील एका बड्या व्यावसायिकाच्या कार्यालयातून टॅब चोरी केला होता.

२ एप्रिल रोजी सकाळी १२ वाजता मोबाइलवर व्यावसायिकाला फोन आला.

७ वाजेपर्यंत ५० हजार रुपये द्या व तुमचा टॅब घेऊन जा’, असे संशयित बोलला.

व्यावसायिकाने कार्यालयात जाऊन खात्री केली असता टॅब चोरल्याचे लक्षात आलं.

चोरट्याकडून टॅबमधील जुन्या मैत्रिणीसोबत असलेले काही खासगी फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन १२ लाखांच्या खंडणीची मागणी केली.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें