घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

खेडच्या पश्चिम भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

खेड तालुक्याच्या पश्चिम भागात गुरुवारी (दि.2) दुपारनंतर झालेल्या वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. यामुळे कैऱ्या गळून पडल्या, तर उन्हाळी बाजरी व भुईमूग, गहू पिकाचे मोठे नुकसान झाले.

गुरुवारी सकाळपासून हवामानात प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारी दोननंतर सोसाट्याचा वारा वाहू लागला. त्यानंतर गारांचा पाऊस सुरू झाला. पाऊस सलग दोन तास सुरू होता. वादळी वाऱ्यामुळे कैऱ्या गळून पडल्या. उन्हाळी बाजरी भुईसपट झाली. भुईमूग पिकात पाणी साचल्याने नुकसान झाले. गव्हाच्या पिकाचे देखील नुकसान झाले.

पाईट, कोये, वांद्रा, कुरकुंडी, करंजविहिरे, वाहगाव, तळवडे, चांदुस, आसखेड, किवळे, धामणे, वाकी तर्फे वाडा, पाळू,अहिरे, हेद्रुज, कोरेगाव, वाघू, टेकवडी, आडगाव, सुपे, भलवडी, सातकरवाडी, कोहिंडे, विराम, आंभु, वेळावले, आंबोली आदी परिसरात जोरदार पाऊस झाला.

भामा आसखेड धरण साखळी क्षेत्रात पाऊस पडल्याने धरणाचे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. अचानक झालेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तहसीलदारांनी पंचनामे करण्याच्या सूचना तलाठी व ग्रामसेवकांना द्याव्यात, अशी मागणी कासारी गावचे सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी दत्तात्रय सखाराम होले यांनी केली आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें