पुणे | प्रतिनिधी
दिनांक २६ जानेवारी रोजी सायंकाळी ५.०० वाजता कात्रज येथील गोकुळनगर परिसरात ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त समाजात प्रेरणा देणारा एक आगळावेगळा उपक्रम पार पडला. पोलीस तपास साप्ताहिक क्राईम रिपोर्टर आणि महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पोलीस तपास सीनियर क्राईम रिपोर्टर महाराष्ट्र राज्य तसेच महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना पुणे शहर अध्यक्ष श्री. चेतन शर्मा यांच्या प्रमुख सहभागातून समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. फायर ब्रिगेड, होमगार्ड तसेच समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या ५० पुरुष व २५ महिला अशा एकूण ७५ मान्यवरांना सन्मानपत्र, ट्रॉफी, शाल व श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. या सन्मान सोहळ्याचा उद्देश समाजात सकारात्मक ऊर्जा, उत्साह व प्रेरणा निर्माण करणे हा असून, पुढील काळातही या मान्यवरांकडून समाजसेवेचे उल्लेखनीय कार्य घडावे, यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या पवित्र प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पोलीस तपास व महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यांच्या वतीने सर्व सन्मानार्थींना विशेष शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमास येवलेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर काळाने सर, तसेच मार्गदर्शक अनिल दत्तात्रय रेळेकर (सामाजिक कार्यकर्ते व अध्यक्ष, पुणे शहर पोलीस मित्र), अक्षर स्कूलच्या मुख्याध्यापिका सूर्यवंशी मॅडम, गोविंद माने सर (समादेशक, पुणे शहर होमगार्ड) यांच्यासह पुरुष व महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा व मार्गदर्शन दत्ताभाऊ जरांडे (थोर सामाजिक कार्यकर्ते) यांनी केले, तर या प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन श्री. विठ्ठल माने (पोलीस उपनिरीक्षक, सेवानिवृत्त – पुणे) यांनी केले. हा सन्मान सोहळा म्हणजे समाजसेवकांच्या कार्याला दिलेली एक प्रेरणादायी दाद ठरली असून उपस्थितांमध्ये देशभक्तीचा आणि समाजभानाचा संदेश देणारा ठरला.











