घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

डिजिटल जनसंवाद ही काळाची गरज’: महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) कामकाज अधिक पारदर्शक करण्यासाठी आणि नागरिकांशी थेट संवाद साधण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ पीएमआरडीए’ या डिजिटल ई-न्यूजलेटरचा गुरुवारी (दि.२ एप्रिल) शानदार शुभारंभ करण्यात आला. ‘बदलत्या तांत्रिक युगात डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करून जनतेशी जोडले जाणे, ही काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी यावेळी केले.

आकुर्डी येथील पीएमआरडीए मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी सहआयुक्त (प्रशासन) रूपाली आवले-डंबे, मुख्य अभियंता रिनाज पठाण, सहआयुक्त (जमीन व मालमत्ता) पूनम मेहता, उपायुक्त हिंमत खराडे, विकास परवानगी विभागाचे संचालक अविनाश पाटील, वित्तीय नियंत्रक जितेंद्र कोळंबे, मुख्य अभियंता शिवप्रसाद बागडी, अग्निशमन विभागाचे प्रमुख देवेंद्र पोटफाडे, उपायुक्त (प्रशासन) राजेश माशेरे, तहसीलदार अभिजित जगताप यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

पीएमआरडीएचे धोरणात्मक निर्णय, राबविण्यात येणारे विविध प्रकल्प आणि विकासकामांची अधिकृत माहिती नागरिकांपर्यंत त्वरित पोहोचावी यासाठी हे ई-न्यूजलेटर महत्त्वाचे माध्यम ठरेल. या उपक्रमामुळे पीएमआरडीएच्या कामात अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता येईल, असा विश्वास महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पीएमआरडीएच्या सहआयुक्त (प्रशासन) रूपाली आवले-डंबे यांनी या उपक्रमाची भूमिका विशद केली. पीएमआरडीएच्या योजना आणि जनहितार्थ निर्णय थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे डिजिटल व्यासपीठ कार्यान्वित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. माहिती व जनसंपर्क अधिकारी पुरुषोत्तम सांगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें