सार्वजनिक कार्यक्रमात नृत्य करताना धक्का लागल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून टोळक्याने चौघांना मारहाण केल्याची घटना ओैंध येथील इंदिरा गांधी वसाहतीत बुधवारी (ता. १) या दिवशी घडली.या प्रकरणी चतुःशृंगी पोलिसांनी टाेळक्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत कुणाल नंदकिशोर तुजारे (वय २२, रा. हनुमान मंदिराजवळ, इंदिरा गांधी वसाहत, ओैंध) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रमोद घडसिंग, समीर घडसिंग, भैय्या सरोदे, तेजस देवकर, ओेंकार पाटोळे (सर्व रा. इंदिरा गांधी वसाहत, ओैंध) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी कुणाल तुजारे याचे वडील बुधवारी (ता. १ ) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास इंदिरा गांधी वसाहतीतील एका सार्वजनिक कार्यक्रमात नृत्य करत होते.त्यावेळी ध्वनिवर्धकावर गीते लावण्यात आली होती. त्यावेळी नाचताना आरोपी घडसिंग याला कुणालच्या वडिलांचा धक्का लागला.
या कारणावरून त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर आरोपींनी कुणालचे वडील नंदकिशोर यांना मारहाण केली. कुणाल आणि त्याचा पुतण्या आरोपींना जाब विचारण्यास गेले असता तेव्हा टोळक्याने त्यांना मारहाण केली.












