घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

श्री सद्गुरु शंकर महाराजांच्या ७९ व्या समाधी सोहळ्याची तयारी सुरू; भाविकांना शिधा अर्पणाचे आवाहन

पुणे – श्री सद्गुरु शंकर महाराजांचा ७९ वा समाधी सोहळा शनिवार दि. १८ एप्रिल २०२६ ते शुक्रवार दि. २४ एप्रिल २०२६ या कालावधीत भक्तीमय वातावरणात संपन्न होणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मठात तयारीला सुरुवात करण्यात आली असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दि. ०२ एप्रिल २०२६ रोजी चैत्र शुद्ध पौर्णिमेनिमित्त साजऱ्या झालेल्या हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी वजनकाटा, शिधा काऊंटर तसेच अन्नपूर्णा पूजन करून समाधी सोहळ्यासाठी शिधा संकलन उपक्रमाची विधिवत सुरुवात करण्यात आली.

या प्रसंगी मठ परिसरात धार्मिक वातावरण अनुभवायला मिळाले.समाधी सोहळ्यानिमित्त मोठ्या प्रमाणावर महाप्रसाद व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेला शिधा भाविकांनी उदार मनाने द्यावा, असे आवाहन विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

तेल, तूप, तांदूळ, मूगडाळ आदी जीवनावश्यक वस्तू मठात आणून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी विश्वस्त मंडळातील डॉ. मिहीर कुलकर्णी, श्री सतीश कोकाटे, श्री सुरेंद्र वाईकर, डॉ. पी. डी. पाटील, श्री राजाभाऊ सुर्यवंशी, श्री निलेश मालपाणी आणि श्री प्रताप भोसले आदी पदाधिकारी विशेष प्रयत्न करत आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो भाविक या समाधी सोहळ्यास उपस्थित राहणार असून, भक्तिभाव आणि श्रद्धेच्या वातावरणात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें