घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

औंध-बोपोडीकरांसाठी मोठा दिलासा : संजय गांधी रुग्णालय होणार मल्टीस्पेशालिटी

पुणे : औंध-बोपोडी प्रभागातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची व दिलासादायक बातमी समोर आली आहे. औंध-बोपोडी येथील संजय गांधी रुग्णालय लवकरच अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात रूपांतरित करण्यात येणार असून त्याचे उद्घाटनही लवकरात लवकर करण्यात येईल, अशी स्पष्ट ग्वाही पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली आहे.

नगरसेवक सनी निम्हण यांनी या संदर्भात पाठपुरावा करत सविस्तर निवेदन सादर केले होते. त्या मागणीची दखल घेत अध्यक्ष भिमाले यांनी सकारात्मक भूमिका घेत, संबंधित रुग्णालयाचा मल्टीस्पेशालिटी योजनेत समावेश करण्याचे आश्वासन दिले.यावेळी त्यांनी विशेषत्वाने स्पष्ट केले की, हे रुग्णालय पीपीपी (Public-Private Partnership) मॉडेलवर देण्यात येणार नाही.

रुग्णालय पूर्णतः पुणे महानगरपालिकेद्वारेच चालवले व व्यवस्थापित केले जाईल.ही भूमिका नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात असून, त्यामुळे सर्वसामान्यांना मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.औंध, बोपोडी तसेच पिंपरी-चिंचवड सीमेलगतच्या परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता या रुग्णालयाचे त्वरित कार्यान्वित होणे व मल्टीस्पेशालिटीमध्ये रूपांतर होणे अत्यंत गरजेचे होते.

या परिसरातील नागरिकांना खालील सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत :•

अत्याधुनिक ट्रॉमा केअर व आपत्कालीन सेवा

• आयसीयू व एनआयसीयू सुविधा

• माता व बाल आरोग्य सेवा

• विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार

• आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी मोफत उपचार

नगरसेवक सनी निम्हण यांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत सांगितले की,“औंध-बोपोडी परिसरातील नागरिकांना दर्जेदार व तात्काळ आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील होतो. स्थायी समिती अध्यक्षांनी सकारात्मक प्रतिसाद देत रुग्णालयाचा समावेश करण्याचे आश्वासन दिले, याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.”या निर्णयामुळे औंध-बोपोडी व आसपासच्या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वास अधिक बळकट होणार आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें