घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

मांगडेवाडी येथे सातारा रस्त्याची सुरक्षा भिंत कोसळली; तातडीच्या दुरुस्तीची गरज

कात्रज : कात्रज परिसरातील मांगडेवाडी येथे अवकाळी पावसामुळे पुणे-सातारा रस्त्यावरील सुरक्षा भिंतीचा काही भाग कोसळला असून रस्त्याचाही काही भाग खचला आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.माऊली हॉटेलजवळ घडलेल्या या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

भिंतीचा उर्वरित भागही कमकुवत झाल्याचे दिसून येत असून पथदिव्याचे खांबही धोकादायक स्थितीत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी अपघात होण्याची शक्यता अधिक असल्याने नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.पुणे-सातारा रस्ता हा अत्यंत वर्दळीचा मार्ग असल्याने या ठिकाणी तातडीने दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे नागरिकांचे मत आहे.

स्थानिक रहिवासी नितीन मांगडे यांनी सांगितले की, “रस्त्याचा आधार कमजोर झाल्यामुळे पुढील धोका टाळण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे.”

सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता हेमंत मोरे यांनी सांगितले की, “घटनेची माहिती मिळाली असून लवकरच पाहणी करून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील.”दरम्यान, वाहतूक पोलिस विभागाकडून या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने तात्पुरती उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें