घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

नांदेडमध्ये रक्ताचा सडा! गँगवारच्या २४ तासांतच पुन्हा एक हत्या

शहरात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या हिंसाचारामुळे नांदेड हादरले आहे. शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या गँगवारमध्ये तीन गुंडांच्या खुनाची घटना ताजी असतानाच, शनिवारी रात्री पुन्हा एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली.

मुरमुरा गल्ली परिसरात झालेल्या या हत्याकांडामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, रज्जू ऊर्फ रणजितसिंग तबेलेवाले (वय ३२) असे मृताचे नाव आहे. शनिवारी रात्री उशिरा मुरमुरा गल्ली भागात दोन इसमांनी रणजितसिंगवर तलवारीने सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, रज्जूचा जागीच मृत्यू झाला.

जुन्या वादातून ही हत्या झाली असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.घटनेची माहिती मिळताच वजीराबाद पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवून दोघा संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी झालेल्या तिहेरी खुनातील आरोपींचा पोलीस शोध घेत असतानाच ही दुसरी घटना घडल्याने पोलीस दलावरही मोठा ताण निर्माण झाला आहे.

शुक्रवारी मध्यरात्री गँगवारमध्ये तीन जणांचा बळी गेला होता. त्या घटनेला २४ तास उलटत नाहीत तोच शनिवारी पुन्हा हत्या झाल्याने नांदेडकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

सलग होत असलेल्या या खुनाच्या सत्रामुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे का? असा सवाल आता नागरिक विचारत आहेत. सध्या वजीराबाद पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें