:भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांनी तपास पथकाला वाहन चोराचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी व तपास पथकाने यशस्वी कारवाई करत वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
तपासादरम्यान आरोपी सागर लक्ष्मण कोळी (वय २५), व्यवसाय – चालक, रा. माने कॉलनी, शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर ३३/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये चोरीस गेलेली दुचाकी (क्रमांक MH 12 NM 9808) हस्तगत करण्यात आली आहे. आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
ही यशस्वी कारवाई मा. अमितेश कुमार (पोलीस आयुक्त, पुणे शहर), मा. रंजनकुमार शर्मा (पोलीस सह आयुक्त), मा. राजेश बनसोडे (अपर पोलीस आयुक्त, पश्चिम विभाग), मा. मिलिंद मोहिते (पोलीस उप आयुक्त, परिमंडळ २), मा. राहुल आवारे (सहाय्यक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल खिलारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी तसेच पोलीस अंमलदार मितेश चोरमले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खखैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार व संदीप आगळे यांच्या पथकाने केली.












