घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

माहेरी आलेल्या विवाहितेचे टोकाचे पाऊल

नागपुर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपुरच्या महादुला (कोराडी) परिसरात एका विवाहितेने आयुष्य संपवल्याने खळबळ उडाली आहे. मयुरी मेंढे असं आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून आपल्या माहेरच्या घरी तिने टोकाचे पाऊल उचलले.

पती पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत असल्याने मानसिक तणावातून हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मृत्यूआधी तिने पतीला लिहलेली चिठ्ठीही पोलिसांनी जप्त केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, “मी तुमच्यावर खूप प्रेम करते…” अशा शब्दात पतीसाठी चिठ्ठी लिहित विवाहितेने माहेरी आपलं आयुष्य संपवल्याची दुर्दैवी घटना नागपुरमधून समोर आली आहे. मयुरी मेंढे असं या विवाहितेचे नाव असून महादुला परिसरात घडलेल्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येपूर्वी मयुरीने भावनिक चिठ्ठी लिहित पतीवर प्रेम व्यक्त केले तसेच मनातील दुःख मांडले, ही चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे.

मृत मयुरी लोंढे आणि तिच्या पतीमध्ये वारंवार वाद होत होते. त्यामुळेच ती मानसिक तणावाखाली होती. वादामुळे महिनाभरापूर्वीच ती माहेरी परतली होती. आपल्या पतीशी तिने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र पती फोन उचलत नसल्याने ती हताश झाली. याच नैराश्यातून मयुरीने घरातील मंडळी बाहेर गेले असताना टोकाचे पाऊल उचलत गळफास घेऊन जीवन संपवले.

पतीवर गंभीर आरोपदरम्यान, रात्री घरातील मंडळी परतल्यानंतर मयुरी दरवाजा उघडत नसल्याने कुटुंबियांना शंका आली. त्यांनी तात्काळ घराचा दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केला असता मयुरीही बेशुद्धावस्थेत आढळून आली. कुटुंबियांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी ती मृत झाल्याचे घोषित केले.

याप्रकरणी माहेरच्या मंडळींनी पतीकडून मानसिक त्रास दिला गेल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी कोराडी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतकाच्या भावाच्या तक्रारीवरुन पोलीस अधिक तपास करत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें