घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

११ एप्रिल रोजी  ‘ग्लोबल एज्युकेशन फेअर २०२६’ चे आयोजन

पुणे : भारतातील आघाडीच्या परदेशी शिक्षण सल्लागार संस्थांपैकी एक असलेल्या Study Smart तर्फे शनिवार, ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०:०० ते सायंकाळी ५:०० या वेळेत रॉयल कॉनॉट, बोट क्लब, पुणे येथे ‘ग्लोबल एज्युकेशन फेअर २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोफत प्रवेश असून, परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा एक ‘वन-स्टॉप सोल्यूशन’ ठरणार आहे.

पत्रकार परिषदेत Study Smart चे व्यवस्थापकीय संचालक चेतन जैन यांनी सांगितले की, बारावीनंतर किंवा पदवी पूर्ण केल्यानंतर परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न अनेक विद्यार्थी पाहतात. मात्र योग्य विद्यापीठाची निवड, प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती, आर्थिक नियोजन आणि निवास व्यवस्था याबाबत अनेकांना संभ्रम असतो.

हा गोंधळ दूर करण्यासाठी या फेअरची रचना करण्यात आली असून, यूके, यूएसए, आयर्लंड, जर्मनी, दुबई, युरोप आदी देशांतील ६० पेक्षा अधिक नामांकित विद्यापीठांचे प्रतिनिधी थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.या फेअरमध्ये शिष्यवृत्ती, आर्थिक सहाय्य, सप्टेंबर २०२६ प्रवेश प्रक्रिया, स्पॉट अॅडमिशन ऑफर्स, आयएलटीएस सवलत, तसेच शिक्षणानंतरच्या नोकरी व करिअर संधी यावर मार्गदर्शन करणाऱ्या कार्यशाळाही आयोजित केल्या जाणार आहेत.

तसेच Study Smart चे प्रमाणित तज्ज्ञ समुपदेशक विद्यार्थी व पालकांना वैयक्तिक मार्गदर्शन देऊन त्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी योग्य निर्णय घेण्यास मदत करतील.विद्यार्थ्यांच्या अधिक सोयीसाठी करिअर काउन्सेलिंग, शिक्षण कर्ज, निवास व्यवस्था, फॉरेक्स आणि प्रवास सहाय्य यांसाठी स्वतंत्र काउंटर देखील उपलब्ध असतील. विद्यार्थी व पालक विविध कर्ज पर्यायांची माहिती घेऊ शकतील, आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया समजू शकतील आणि परदेशातील शिक्षणासाठी योग्य आर्थिक पर्याय निवडण्याबाबत मार्गदर्शन मिळवू शकतील.

या फेअरचे महत्त्व अधोरेखित करताना श्री. जैन यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय विद्यापीठांशी थेट संपर्क साधण्याची, विविध अभ्यासक्रमांची माहिती घेण्याची आणि परदेशात शिक्षणासाठी योग्य दिशा मिळवण्याची ही उत्तम संधी आहे.‘ग्लोबल एज्युकेशन फेअर २०२६’साठी नोंदणी पूर्णपणे मोफत आहे. इच्छुक विद्यार्थी व पालक https://studysmart.short.gy/cGRE88 या लिंकवर नोंदणी करू शकतात किंवा अधिक माहितीसाठी ९६५०६ ८००७२ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें