घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

टँकरच्या धडकेत अभियंता तरुणीचा मृत्यू ; वानवडीत अपघात

भरधाव टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार अभियंता तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना वानवडीतील गंगा सॅटेलाईट सोसायटीसमोर मंगळवारी सकाळी घडली. या प्रकरणी टँकर चालकाला वानवडी पोलिसांनी अटक केली.

ग्रेसिया डॅनिअल इसा (वय २२, रा. नॅन्सी टाॅवर, केदारी पेट्रोल पंपासमोर, वानवडी) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी टँकर चालक संतोषकुमार इंद्रदेवप्रसाद मौर्या (वय ३४, सध्या रा. नेताजीनगर, वानवडी, मूळ रा. रजौली, जि. नवादा, बिहार) याला अटक करण्यात आली.याबाबत ग्रेसियाची आई गीता (वय ४९) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रेसिया ही अभियंता असून, नांदेड सिटी परिसरातील एका खासगी कंपनीत ती कामाला आहे. मंगळवारी तिला सकाळी कामावर लवकर बोलावले होते. त्यामुळे गडबडीत ती घरातून बाहेर पडली. वानवडीतील गंगा सॅटेलाईट सोसायटी रस्त्यावर भरधाव पाण्याच्या टँकरने दुचाकीस्वार ग्रेसियाला धडक दिली.टँकरच्या चाकाखाली ती सापडली.

गंभीर जखमी झालेल्या ग्रेसियाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले.अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. टँकर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याला अटक केली.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें