घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

शेअर बाजारातून परताव्याच्या आमिषाने डॉक्टरची फसवणूक

शेअर मार्केटमध्ये दरमहा दहा टक्के परतावा देण्याचे आम्ही दाखवून बार्शी येथील एका डॉक्टरला 52 लाख रुपयाला फसवण्याचा प्रकार समोर आला आहे.

संदीप दिलीप वायचळ (रा.अध्यापक कॉलनी, कुर्डुवाडी रोड, बार्शी) असे फसवणूक केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

डॉ. मिलिंद विभीषण चौधरी (वय 39, रा. फुले प्लॉट, उपळाई रोड, बार्शी) यांनी याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, वायचळ हे इन्कम टैक्स भरण्याचेे काम करतात. त्यामुळे चौधरी यांची व त्यांची चांगली ओळख झाली होती.

वायचळ यांनी सांगितले की, मी शेअर मार्केटिंगमध्ये पैसे गुंतवतो व दोन ते तीन महिन्यात गुंतवलेले पैसे दुपटीने तिपटीने कमावतो.तुम्हाला दरमहा 10 टक्के नफा कमाऊन देतो असे चौधरी यांना सांगितले. त्यानुसार शेअर मार्केटमध्ये सुरुवातीला 5 लाख रुपये गुंतवले. त्यानंतर पुणे येथील एका कंपनीच्या 10 लाख गुंतविण्यास सांगितले. मोनार्क ट्रेडिंग ॲपचा सुध्दा ब्रोकर व एजंट 40 लाख रुपये अँपच्या अकाउंटवर पाठविण्यास सांगितले.

सुरुवातीला 3 लाखांचा परतावा म्हणून वायचळ याने डॉ. चौधरी यांना 3 लाख रुपये ऑनलाईन पाठवले.काही दिवसांनी वायचळ याने पैसे देणे बंद केले. डॉ. चौधरी यांची 52 लाखांची फसवणूक झाली. पैसे मागितल्यास आत्महत्या करेन व तुला केसमध्ये गुंतवेन अशी धमकी वायचळ याने डॉ. चौधरी यांना दिली. याबाबत अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक महेश गळगटे करीत आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें