घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

भरधाव ट्रकच्या धडकेत बँकेच्या अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू

अंबाजोगाई शहरात रिंग रोडवरील मानवलोक कार्यालयाजवळ आज बुधवारी सकाळी भीषण अपघातात बँक अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरून बँकेत जाताना पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने अधिकाऱ्याला धडक दिली. या धडकेत बँक अधिकाऱ्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुदर्शन टाक असे बँक अधिकाऱ्याचे नाव आहे. सुदर्शन हे सकाळी दुचाकीवरून कामासाठी निघाले होते. तथागत चौकाजवळ पोहोचल्यानंतर रिंग रोडवरून प्रवास करताना एका अनियंत्रित आणि भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर मार लागल्याने सुदर्शन टाक याचा घटनास्थळी जागीच मृत्यू झाला.

अपघात झाल्याची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने घटनेचा पंचनामा केला केला आहे. बँक अधिकाऱ्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या अपघाताचा पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे.

अपघाताची माहिती मिळताच दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष अॅड. मकरंद पत्की, इतर संचालक, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात आणि घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली. सुदर्शन टाक हे मूळचे उजनी गावचे रहिवासी आहेत. सुदर्शन हे बँक परिवारात त्यांच्या मनमिळाऊ आणि शांत स्वभावासाठी परिचरित होते. त्यांच्या निधनाने दीनदयाळ बँक परिवारासह संपूर्ण शहरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. आज बुधवारी सायंकाळी त्यांच्या मूळगावी उजनी येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें