घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

परवानगीविना बोअरवेल खोदणाऱ्या पुणेकराचा जामीन फेटाळला

पुण्यातील शुक्रवार पेठेत घरासाठी बोअरवेल खोदताना मेट्रोच्या भूमिगत बोगद्याला छिद्र पाडणाऱ्या घरमालकाला आणि कंत्राटदाराला पुणे न्यायालयाने मोठा दणका दिला आहे. सार्वजनिक सुरक्षेशी खेळ केल्याचा ठपका ठेवत सत्र न्यायाधीश आर. आर. मेंढे यांनी घरमालक धनंजय मोटे आणि ठेकेदार प्रताप जगताप यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

या निर्णयामुळे विनापरवाना खोदकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.ही घटना 14 मार्च रोजी खडक पोलीस ठाण्यासमोर असलेल्या एका जुन्या वाड्यात घडली. शिवाजीनगर ते स्वारगेट या भूमिगत मेट्रो मार्गाच्या अगदी वर घरमालकाने प्रशासनाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता बोअरवेलचे काम सुरू केले.

खोदकाम सुरू असताना बोअरवेलचे यंत्र थेट मेट्रोच्या बोगद्यात घुसले. यामुळे बोगद्याची सिमेंटची भिंत फुटून तिथे 6 इंच व्यासाचे छिद्र पडले. सुदैवाने, त्यावेळी तिथून मेट्रो जात नव्हती, अन्यथा मोठा अनर्थ ओढवला असता.

सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले, असा युक्तिवाद प्रमुख जिल्हा सरकारी वकील बोंबटकर यांनी केला.महामेट्रोचे संयुक्त महाव्यवस्थापक शंतनू गोरात्रा यांनी या प्रकरणी तक्रार दिली होती. या एका चुकीमुळे मेट्रोच्या मालमत्तेचे सुमारे 2.5 Lakh रुपयांचे नुकसान झाले आहे. मेट्रो मार्ग असल्याची पूर्ण कल्पना असूनही घरमालकाने निष्काळजीपणा केला.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें