घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

तुकाराम मुंढेंबाबत सवाल करताच आमदाराचे अजब विधान

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची मागील 21 वर्षाच्या कारकीर्दीत 24 वेळा बदली झाली आहे. कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांची अलीकडेच दिव्यांग विभाग मंत्रालयाच्या सचिव पदावरून आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनवर्सन, महसूल व वन विभाग मंत्रालयाच्या सचिव पदी बदली करण्यात आली.

याशिवाय अलीकडेच त्यांच्या आई आसराबाई हरिभाऊ मुंढे यांचे निधन झाले. मात्र त्यांनी आईच्या अस्थीचे विसर्जन न करता शेतात वृक्षरोपण केले. त्यांच्या या निर्णयाचेही अनेकांकडून कौतुक करण्यात आले.

नेहमीच कौतुकास्पद काम करणाऱ्या तुकाराम मुंडे यांच्याबाबत आमदार सदाभाऊ खोत यांनी मात्र अजब विधान केलं आहे. ‘मला तुकाराम महाराजांबद्दल माहित आहे. नवीन युगातील तुकारामांबाबत फारशी माहिती नाही,’ असं वक्तव्य आमदार सदाभाऊ खोत यांनी केले.

सदाभाऊ खोत हे नांदेडमध्ये तीन दिवस विधिमंडळ अंदाज समिती दौऱ्यावर आहे. समितीकडून जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेतल्यानंतर खोत यांनी एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालया भेट दिली.

तुकाराम मुंढे यांची वारंवार बदली का केली जाते? असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर आमदार सदाभाऊ खोत यांनी, “माझं घराने वारकरी संप्रदायाच असल्यामुळे संत तुकाराम महाराजांबाबत मला माहिती आहे. माझे वडील वारकरी होते, त्यांना अनेक अभंग पाठ होते, पण नवीन युगातील तुकारामांबाबत फारशी माहिती नाही”, असं अजब विधान केलं.

दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून काम करताना तुकाराम मुंढे यांनी अनेक प्रलंबित प्रकरणे निकाली काढली आणि विभागातील दीर्घकाळ चालत आलेल्या अनियमितता उघडकीस आणल्या. कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीवर नियंत्रण, शिस्त पाळणे आणि राजकीय दबावाला बळी न पडता निश्चित धोरण राबवणे ही त्यांची खासीयत आहे.

दरम्यान, आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली झाल्याने दिव्यांग बांधव आक्रमक झाले आहेत. तुकाराम मुंढे यांची बदली रद्द करण्यात यावी या मागणीसाठी नांदेडमध्ये दिव्यांग संघटनेकडून आज आंदोलन करण्यात आले.

तुकाराम मुंढे हे २००५ च्या IAS तुकडीतील अधिकारी आहेत. प्रशासकीय वर्तुळात त्यांची कार्यशैली अत्यंत शिस्तबद्ध, पारदर्शक आणि कठोर म्हणून प्रसिद्ध आहे. गेल्या २१ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांच्या २४ वेळा बदल्या झाल्या आहेत. या वारंवार होणाऱ्या बदल्यांमुळे प्रशासकीय यंत्रणेवर अनेकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें