घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

छेडछाडीमुळे दहावीच्या मुलीने संपवले जीवन

बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.सततच्या छेडछाडीला कंटाळून दहावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. याबाबत कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले असून आरोपी ट्रॅक्टर चालक आहे. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. ही संतापजनक घटना बीडच्या केज तालुक्यातील चिंचोलीमाळी परिसरातील एका गावात घडली.

आत्महत्या करणाऱ्या तरुणीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली. गेल्या काही महियांपासून गावातील एका तरुणांकडून तिचा पाठलाग केला जात होता. तो वारंवार तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे ती मानसिक तणावाखाली होती. यामुळे मुलीच्या सुरक्षिततेसाठी तिचे शिक्षण केज येथील दुसऱ्या शाळेत सुरू करण्यात आले होते. तसेच तिच्या राहण्याची सोयही बदलण्यात आली होती. तरीदेखील संबंधित तरुणाने तिचा पाठलाग सुरूच ठेवला. घटनेच्या दिवशी सायंकाळच्या सुमारासही त्याने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. त्यामुळे ती अधिकच तणावाखाली गेली होती.

पीडित मुलीने घरात असतांना गळफास घेत आपले जीवन संपवले. रात्री उशिरा कुटुंबियांच्या हा प्रकार लक्षात आला. तेव्हा त्यांनी तात्काळ पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. या प्रकरणामुळे तिच्या कुटुंबीयांनी पोलिसात अक्षय भगवान काळे (वय 27) याच्याविरुधात तक्रारही केली होती. मात्र त्यावर ठोस कारवाई झाली नसल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २४ वर्षीय तरुणानेच मित्रांसोबत झालेल्या वादातून आणि वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला न बोलावल्यामुळे नैराश्यातून विष प्रश्न करून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. महेश उद्धव भणगे असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातील कुंबेफळ येथे घडली.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें