दिनांक 08/04/2026 रोजी क्रांतिवीर सेनेच्या वतीने गंज पेठ, पुणे येथील क्रांतीसूर्य सत्यशोधक महात्मा ज्योतिबा फुले वाडा (A-ग्रेड वारसा स्थळ) येथे मूलभूत सुविधा व सुरक्षा व्यवस्थे बाबत गंभीर निवेदन पुणे महानगरपालिका आयुक्तांना सादर करण्यात आले.
मुख्य मागण्या:
महात्मा फुले वाडा ते आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे तालीम या दरम्यान तात्काळ दिशादर्शक फलक बसवावेत.
महात्मा फुले वाड्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी स्वच्छ व सुरक्षित पिण्याच्या पाण्याची आधुनिक व्यवस्था (वॉटर कूलर/फ्रिजर) उपलब्ध करावी.
महात्मा फुले वाड्याच्या संपूर्ण परिसरात उच्च दर्जाचे CCTV कॅमेरे बसवून हेसुरक्षा वाढवावी.
या मागण्या केवळ सुविधा नसून वारसा स्थळाचे संरक्षण, पर्यटकांची सुरक्षितता आणि सामाजिक जबाबदारीचा महत्त्वाचा भाग आहेत.
यावेळी संस्थापक अध्यक्ष मनोज आप्पा क्षीरसागर तसेच अभिषेक गोळे, तेजस माने, प्रवीण क्षीरसागर, प्रज्वल आडागळे, तेजस साबळे, विनायक साबळे आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वारसा जपा – सुरक्षितता वाढवा – सुविधा द्या! प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी हीच जनतेची ठाम मागणी!












