घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

शहराच्या मध्यवर्ती भागात झाडाझडती, पोलिसांची ४० जणांविरोधात कारवाई

डेक्कन जिमखाना, शिवाजीनगर, तसेच मध्य भागातील विश्रामबाग, खडक, समर्थ, फरासखाना पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांनी गुरुवारी रात्री झाडाझडती घेतली. या कारवाईत वेगवेगळ्या भागांत तपासणी करण्यात आली.बेकायदा प्रकार करणाऱ्या ४० जणांविरोधात खटले, तसेच गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली.

परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या नेतृत्वाखाली फरासखाना, समर्थ, खडक, विश्रामबाग, डेक्कन आणि शिवाजीनगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ही मोहीम राबविण्यात आली. मध्य भागातील ४१ संवेदनशील ठिकाणे, मोकळ्या जागा, तसेच सार्वजनिक जागांची तपासणी करण्यात आली.

सार्वजनिक मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन, शांतता भंग करणे, तसेच छेडछाड करणाऱ्यांविरोधात पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. गुरुवारी रात्री दोन तास ही माेहीम राबविण्यात आली. भारतीय न्याय संहिता कलम २८५ अन्वये दोन गुन्हे दाखल केले.

सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान, तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणे (कोटपा ॲक्ट) अन्वये पाच खटले दाखल करण्यात आले. महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये २२ जणांविरुद्ध कारवाई केली. वाहतूक नियमभंग केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली. ट्रिपल सीट जाणाऱ्या दहा दुचाकीस्वारांविरोधात कारवाई करण्यात आली.

वाहन चालवताना मोबाइलवर संभाषण करणे, तसेच राँग साईडने जाणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात कारवाई करण्यात आली. पोलिस आयुक्त अमितेशकुमार, पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांच्या मार्गदर्शनाखाली खडक, शिवाजीनगर, डेक्कन, विश्रामबाग, फरासखाना, समर्थ पोलिस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पथके या कारवाईत सहभागी झाले होते.

‘पुढील काळात पोलिसांकडून अचानक कारवाई करण्यात येणार असून, संवेदनशील ठिकाणांची तपासणी करण्यात येणार आहे,’ असे पोलिस उपायुक्त रावले यांनी सांगितले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें