घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

सिल्व्हर मोटर्स- निसान’च्या नव्या भव्य शोरूमचे शानदार उद्घाटन

पुण्यातील ऑटोमोबाईल क्षेत्रात १९३५ पासून विश्वासार्ह नाव असलेल्या सिल्व्हर जुबिली ग्रुपअंतर्गत कार्यरत सिल्व्हर मोटर्स – निसान या नव्या अत्याधुनिक शोरूमचे पुणे कॅम्प येथे भव्य उद्घाटन पार पडले.

या शोरूमचे उद्घाटन निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स यांच्या हस्ते झाले. यावेळी निसान मोटर इंडियाचे डायरेक्टर अभिषेक अरोरा, विवेक पल्लिवाल, राकेश नेगी, मृन्मय गोगोई तसेच निसानची टीम उपस्थित होती.भारतामध्ये निसानची उपस्थिती १९६५ पासून असून, भारतीय सैन्याने विश्वास ठेवत निसान पॅट्रोल ६० (जोंगा) वाहनाची निवड केली होती.

विविध युद्ध मोहिमांमध्ये हे विश्वासार्ह वाहन ठरले असून, निसान हे ब्रँड भारतात विश्वासार्हतेचे प्रतीक आहे.सिल्व्हर जुबिली ग्रुपचा वारसा १९३५ पासून पुणे कॅम्प परिसरात पेट्रोल पंप, कार शोरूम व सर्व्हिस स्टेशनच्या माध्यमातून दृढपणे रुजलेला आहे. सिल्व्हर मोटर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या व्यवस्थापकीय संचालक राजवर्धिनी संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प साकारण्यात आला आहे.

प्रमुख मान्यवर उपस्थिती :

आमदार रवींद्र चव्हाण (भाजप प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र), राजेश पांडे (प्रदेश सरचिटणीस, महाराष्ट्र), आमदार संजय जगताप ( भाजप प्रदेश सचिव, महाराष्ट्र), समरादित्य संजय जगताप, राजेंद्र पाटील, खासदार अशोक मोहोळ, आमदार संग्रामदादा थोपटे, आमदार दिलीपराव मोहिते, आमदार रमेश अप्पा थोरात, आमदार अशोकराव पवार, आमदार अतुल बेनके, आमदार सुनील कांबळे, वीरधवल जगदाळे, हरिभाऊ लोळे,अजय इंगळे, स्वरूपा थोपटे, सुजाता पवार, तुषार थोरात, प्राजक्ता दुर्गुडे, दिगंबर दुर्गुडे (चेअरमन, पीडीसीसी बँक), उपाध्यक्ष सुनील चांदेरे, माजी अध्यक्ष रमेश थोरात तसेच सर्व संचालक मंडळ, संत सोपानकाका सहकारी बँकेचे चेअरमन व सर्व संचालक, अधिकारी व कर्मचारी आनंदी जगताप (नगराध्यक्ष, सासवड नगरपालिका), सनदी अधिकारी डॉ. राजेंद्र चंद्रकांत जगताप (IDES),संरक्षण मंत्रालय – प्रिन्सिपल डायरेक्टर, सदर्न कमांड, सौ. केतकी अजय शिर्के (शिर्के इंडस्ट्रीज), सौ. नीताताई पाटील (पवार), गौरवी भोसले (चेअरमन, जागृती साखर कारखाना), प्रवीण गायकवाड, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, सर्व संचालक, अधिकारी व कर्मचारी तसेच सिल्व्हर मोटर्सचे कर्मचारी मोठ्या संख्येन े उपस्थित होते.

नवीन शोरूममध्ये अत्याधुनिक वाहनांची श्रेणी उपलब्ध असून, आधुनिक सुविधा व ग्राहक केंद्रित सेवेमुळे पुणेकरांना उत्कृष्ट अनुभव मिळणार आहे. तसेच सिल्व्हर मोटर्स – निसान लवकरच पुणे शहर व जिल्ह्यात विस्तार करणार असल्याचे सांगण्यात आले.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें