घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

गरीब गरीब म्हणून रडला नाही तर लढला, एसटीचीही सुविधा नसलेल्या जतचा रोहन पुणे पोलीस दलात

प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीने मात करत कुणीकोणूर (आबाचीवाडी) येथील रोहन संतोष खर्जे याने पुणे पोलीस दलात भरती होत यश संपादन केले. लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरवलेल्या रोहनला आजोबा आबा खर्जे व आजी छाया खर्जे यांनी कष्टातून उभे केले.

आर्थिक अडचणींवर मात करत रोहनने शिक्षण पूर्ण केले. प्राथमिक शिक्षण आबाचीवाडी, माध्यमिक हुडेबाबा हायस्कूल (कुणीकोणूर) तर उच्च माध्यमिक शिक्षण येळवी येथील श्री समर्थ शिवप्रभू विद्यालयात झाले.

शिक्षणासोबतच त्याने शेतात मोलमजुरी करत खर्च भागवला.दिवसाचे कष्ट आणि रात्रीचा अभ्यास याच्या जोरावर त्याने पुणे येथील पोलीस भरतीत यश मिळवले.

त्याच्या यशामुळे गावात आनंदाचे वातावरण असून सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी रोहनचे यश प्रेरणादायी ठरत असून ‘कष्टाला पर्याय नाही’ हे त्याने सिद्ध केले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें