घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

मुंबई विमानतळावर भीषण आग, ‘टर्मिनल वन’ आग

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई विमानतळावर भीषण आग लागली आहे. मुंबई विमानतळाच्या टर्मिनल वन वर ही आग लागली आहे.आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

गुरुवारी, मुंबईतील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1बी मध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच, मुंबई अग्निशमन दलाला अतिरिक्त कुमक मागवण्यात आली. विमानतळाच्या पथकांनीही आग विझवण्यास सुरुवात केली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबई महानगरपालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार, 9 एप्रिल (गुरुवारी) सायंकाळी 6.35 मिनिटांनी विमानतळावर आग लागल्याची माहिती मिळाली. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ टर्मिनल 1, सांताक्रूझ पूर्व येथील तळमजला अधिक तीन मजले (G+3) असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर आग लागली आहे. घटनास्थळी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान, पोलीस, बीएमसीचे प्रभाग कर्मचारी उपस्थित आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

मुंबईच्या विलेपार्ले भागातील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1 मधून दाट धूर निघताना दिसत आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 1बी मध्ये आग लागल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई अग्निशमन दलाच्या मुख्य अग्निशमन अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, टर्मिनलमधील केबल ट्रे आणि स्विच बॉक्समध्ये आग लागल्याचे सांगण्यात आले आहे.

शिवाय, ही आग टर्मिनलच्या तळमजल्यापुरतीच मर्यादित असल्याचे सांगण्यात येत आहे. आग विझवण्यासाठी मुंबई अग्निशमन दल, पोलीस आणि वॉर्ड कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनेची माहिती मिळताच विमानतळाच्या अग्निशमन गाड्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांना मुंबई अग्निशमन दलाची अतिरिक्त मदत बोलवावी लागली.

मुंबई अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी यांच्या माहितीनुसार, टर्मिनलमधील केबल ट्रे आणि स्विच बॉक्समध्ये आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, आग टर्मिनलच्या तळमजल्यापुरतीच मर्यादित आहे. आग विझवण्यासाठी मुंबई अग्निशमन दल, पोलीस आणि वॉर्ड कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

विमानतळावर आग लागल्याने एकच खळबळ उडाली आणि गोंधळ निर्माण झाला. गेल्या बऱ्याच वेळापासून टर्मिनल 1 वरील वाहतूक विस्कळीत झाली असल्याचं वृत्त समोर आलं आहे. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव प्रवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें