बीडच्या केज तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर तिच्याच चुलत चुलत्याने बळजबरी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली होती. अत्याचारानंतर पिडीतेने विष प्राशन करून आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.
तिच्यावर गेल्या दोन दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र काल (शुक्रवारी, ता १०) तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणाने बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. तर आरोपीवर कठोर कारवाई व्हावी अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.
केजमध्ये ही घटना घडली होती. नात्याने चुलत चुलत्याने बळजबरी केली. अत्याचार केल्यांनतर अल्पवयीन मुलीने विष घेतल्याची घटना केज तालुक्यातील एका गावात समोर आली आहे. दरम्यान, अल्पवयीन मुलीला उपचारासाठी तिला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आल्यांनतर उपचार सुरू असताना शुक्रवारी तिचा मृत्यू झाला.
केज तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी ५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या दरम्यान गोठ्यातून घरी जात असतांना तिच्यावर चुलत चुलत्याने अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. घटनेनंतर मुलीने विष घेत जीवन संपवण्याचा प्रयत्न केला.
प्रकृती बिघडल्याने पीडितेला छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मुलीचा मृत्यू झाल्याचे पोलिस उपचार सुरू असतांना शुक्रवारी उपनिरीक्षक उमेश निकम यांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी चुलत चुलत्याला अटक केली आहे, पोलिस आधिक तपास करत आहेत.












