घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

पुण्याला काम करणारा मुलगा घरी आला अन् जिवाला मुकला

हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यात रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. इथं एका महिलेनं अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या २४ वर्षीय मुलाची निर्घृण हत्या केली आहे.

महिलेनं आपल्या प्रियकराच्या मदतीने अन्य एकाला सुपारी देऊन मुलाची हत्या घडवून आणली . या प्रकरणी पोलिसांनी मृत तरुणाची आई, तिचा प्रियकर आणि सुपारी घेणाऱ्या आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सचिन राजगुरू (वय २४, रा. वडद, ता. लोणार) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो पुणे येथे कामाला होता. काही दिवसांपूर्वी तो गावी परतला होता. गावी आल्यानंतर त्याला आपली आई लीलाबाई (५५) आणि गावातीलच रामदास तनपुरे (६५) यांच्यातील अनैतिक संबंधांची माहिती मिळाली. सचिनने या संबंधांना विरोध करण्यास सुरुवात केली होती.

मुलाकडून होत असलेल्या विरोधाचा भविष्यात त्रास होईल आणि आपले संबंध उघड होतील, या भीतीने आई लीलाबाई आणि प्रियकर रामदास यांनी सचिनचा कायमचा काटा काढण्याचा कट रचला.दगडाने ठेचून निर्घृण हत्यासचिनची हत्या करण्यासाठी लीलाबाई आणि रामदास यांनी नरेश पवार नावाच्या व्यक्तीला २५ हजार रुपयांची सुपारी दिली.

योजनेनुसार, आरोपी नरेश आणि रामदास यांनी सचिनला ‘पाहुण्यांकडे जाऊन येऊ’ असे सांगून घराबाहेर नेले. साखरा परिसरात त्याला बेसावध करून दारू पाजली. त्यानंतर उमरदरा शिवारात नेऊन दगडाने चेहरा ठेचून सचिनची निर्घृण हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह जामदया शिवारातील एका नाल्यात फेकून दिला.

पोलिसांनी असा लावला छडा८ एप्रिल रोजी नाल्यात चेहरा ठेचलेला मृतदेह आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) तपासाची चक्रे वेगाने फिरवत बेपत्ता व्यक्तींची माहिती घेतली. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे मृतदेह सचिन राजगुरूचा असल्याचे स्पष्ट झाले.

तपासादरम्यान पोलिसांना सचिनच्या आईच्या संशयास्पद वर्तणुकीची आणि तिच्या प्रेमसंबंधांची माहिती मिळाली. सखोल चौकशी केली असता, आई लीलाबाई, प्रियकर रामदास तनपुरे आणि सुपारी घेणारा नरेश पवार या तिघांनी मिळून हा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी शुक्रवारी तिन्ही आरोपींना वडद येथून अटक केली असून, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोटच्या मुलाचा आईनेच जीव घेतल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें