मस्साजोग गावचे मृत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुखांचा साडू दादासाहेब खिंडकर 13 महिन्यांच्या कालावधीनंतर कारागृहाबाहेर पडला आहे. एका तरुणाला अमानुष मारहाण झाल्यानंतर एक व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला होता.
याच प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत खिंडकर विरोधात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान बाहेर येताच दादासाहेब खिंडकरने खळबळजनक दावा केला आहे. जेलबाहेर येण्यासाठी संतोष देशमुख हत्या प्रकरणाची केस मागे घेण्याची धमकी देण्यात आल्याचा खिंडकर यांनी केला आहे.
धनंजय देशमुख यांचे साडू दादासाहेब खिंडकर याने एका तरुणाला बेदम मारहाण करताना आणि एका गाडीची तोडफोड करताना असे दोन व्हिडीओ समाज माध्यमावर झाले होते. बीड तालुक्यातील बाभुळवाडी गावातील ओमकार सातपुते या तरुणाला चार जणांच्या टोळक्याकडून मारहाण करण्यात आली. ज्यात दादासाहेब खिंडकर याचा समावेश होता. या प्रकरणात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर दादासाहेब खिंडकर पोलीस अधीक्षक कार्यालयात सरेंडर झाला होता. वर्षभर कारागृहात राहिल्यानंतर अटी शर्तीवर त्याची जामीन झाली. परंतु जामिनावर बाहेर पडताच दादा खिंडकरने केलेल्या दाव्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.दादा खिंडकरच्या दाव्याने खळबळ13 महिन्यानंतर बाहेर आल्यानंतर खिंडकरचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.
दादासाहेब खिंडकर म्हणाला, आमच्यावर ज्यावेळी गुन्हा दाखल केला गेला त्यावेळी मला जेलमधून सोडण्यासाठी धनंजय देशमुखकडे प्रस्ताव देण्यात आला. दादा खिंडकरला बाहेर काढायच असेल तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात दिलेली तक्रार मागे घ्या… आम्ही दादा खिंडकरला सोडवू असा प्रस्ताव दिला होता.
माझ्या कुटुंबाला देखील हा प्रस्ताव दिला होता, मात्र तो त्यांनी नाकारला. देशमुख कुटुंबियांच्यासोबत कायम असून हा लढा आमचा जीव गेला तरी सुरूच राहणार आहे.जुन्या व्हायरल व्हिडीओवर खिंडकर काय म्हणला?जुन्या मारहाण व्हिडीओ व्हायरल प्रकरणी दादा खिंडकर म्हणाला, आम्हाला अडकवण्यासाठी षडयंत्र रचण्यात आले होते. या मागे राजकीय मंडळी आहे. संतोष देशमुखांची हत्या झाली त्यामध्ये या लोकांचा वापर केला गेला. हे प्रकरण दाबण्यासाठी जुने व्हिडीओ पुढे आणतात.












