घेरा सिंहगड येथील आई काळूबाई मंदिरात दीपोत्सव व विद्युत रोषणाई उत्साहात पाटील हॉस्पिटलतर्फे महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन हवेली तालुक्यातील पश्चिम भागात दुष्काळाची दाहकता ; भात, भुईमूग, घेवडा पिके करपली – आमदार श्री.मा.भिमराव (आण्णा)तापकीर यांच्याकडून पाहणी, तातडीने पंचनामे करण्याची मागणी किल्ले सिंहगडावर शिवभक्तांकडून शिव- शक्तीचा जागर ;श्री अमृतेश्वर भैरव-आदिशक्ती जोगेश्वरी मातेचा जयघोष सिंहगडाचे गड दैवत श्री चौंडाई माता मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम उत्साहात संपन्न अमोल सणस यांची भाजप उद्योग आघाडीच्या प्रदेश सहसंयोजकपदी नियुक्ती; साताऱ्यामध्ये मित्रपरिवाराकडून जल्लोषात अभिनंदन!

खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण

चालक सीटवर बसलेला असतानाच चार-पाच जण बसमध्ये घुसले. दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांनी डोक्यात मारले. त्यानंतर त्याचे कपडे फाडले आणि त्याला जबरदस्ती खेचत खाली नेले आणि लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

यात चालक गंभीर जखमी झाला आहे.मिरा-भाईंदर महापालिका परिवहन विभागाच्या बस चालकावर हा हल्ला करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांनी कोपरीमध्ये ही घटना घडली. शंकर गजानन चव्हाण असे हल्ल्यात जखमी झालेल्या चालकाचे नाव आहे.

बसचालकाला मारहाण, वादाचे कारण काय?

कोपरीकडे येत असताना एका स्कुटीचालकाने बसला कट मारला. त्यावरून बस चालक शंकर चव्हाण आणि स्कुटीचालकामध्ये वाद झाला. बसमधील प्रवाशांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. पण, स्कुटी चालकाने आणखी लोकांना बोलावून घेत बसचा पाठलाग केला.कोपरी येथे शेवटच्या बसस्थानकावर बस थांबली.

त्यावेळी बसमध्ये कुणीही नव्हते, त्याचवेळी स्कुटीचालक त्याच्या साथीदारांसह बसमध्ये घुसला आणि त्यांनी थेट दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. डोक्यात दांड्याने मारले.

कपडे फाडले, रस्त्यावर ओढून मारहाण

आरोपी आणि त्याच्या साथीदारांनी बसचालकाचे कपडे फाडले. सगळ्यांनी मिळून त्याला जबरदस्ती बसमधून ओढत खाली नेले. त्यानंतर बसमधून खाली नेल्यावर रस्त्यावर पाडले आणि सगळ्यांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

काही वेळात तिथे पोलीस आले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आली. त्यानंतर चालकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी निलेश शिंदे आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात हत्येचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा आणण्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सीसीटीव्ही व्हिडीओ ताब्यात घेतला असून, आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Advertisements
Advertisements

Leave a Comment

और पढ़ें